मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील बड्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील बड्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Crime in Pune: पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथील एका रुग्णालयात गरोदर महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 17 ऑगस्ट: पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत येथील एका रुग्णालयात गरोदर महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळा (labor pain) येत असल्याने डॉक्टरने ही अमानुष मारहाण (doctor beat pregnant woman) केल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित गरोदर महिलेनं यवत पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर विरोधात गुन्हा (FIR Lodged) दाखल केला आहे. यवत पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास केला जात आहे. पूजा गोरख दळवी असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव असून त्या गरोदर आहेत. फिर्यादी पूजा दळवी यांना प्रसूती कळा येत असल्याने त्या यवत येथील नामांकित जयवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. दरम्यान त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने येथील एका डॉक्टरने त्यांना अमानुष मारहाण केली आहे. आरोपी डॉक्टरने फिर्यादी महिलेच्या तोंडावर, डोक्यावर, हातांवर, मांडीवर आणि ओठांवर चापटीने आणि बुक्क्याने अमानुष मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. हेही वाचा-मोबाइल न दिल्याने पत्नीची सटकली; विळ्याने नवऱ्याचे ओठ कापून घेतला बदला ही मारहाण इतकी अमानुष होती की, या मारहाणीत पूजा दळवी यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला चेहऱ्यावर काळ्या निळ्या जखमा झाल्या आहेत. ही घटना उघडकीस येताच हॉस्पिटल आवारात एकच खळबळ उडाली आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित गरोदर महिलेनं थेट यवत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
First published:

Tags: Crime news, Pune

पुढील बातम्या