मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई लोकल सुरु करण्यासाठी घाटकोपर, कांदिवली, चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भाजपचं आंदोलन; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

मुंबई लोकल सुरु करण्यासाठी घाटकोपर, कांदिवली, चर्चगेट रेल्वे स्टेशनवर भाजपचं आंदोलन; कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल (Mumbai Local) सुरु करावी या मागणीसाठी भाजपनं (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मुंबईत (Mumbai Bjp) भाजप नेत्यांच्या नेतृत्त्वात वेगवेगळ्या रेल्वे (Railway Station) स्टेशनवर आंदोलन (Protest) करण्यात येत आलं.

पुढे वाचा ...

मुंबई, 06 ऑगस्ट: सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल (Mumbai Local) सुरु करावी या मागणीसाठी भाजपनं (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मुंबईत (Mumbai Bjp) भाजप नेत्यांच्या नेतृत्त्वात वेगवेगळ्या रेल्वे (Railway Station) स्टेशनवर आंदोलन (Protest) करण्यात आलं. कांदिवलीमध्ये (Kandivali) भाजप आमदार (Bjp Mla) अतुल भातखळकरांच्या (Atul Bhatkhalkar) नेतृत्त्वात आंदोलन केलं गेलं. तर चर्चगेट (Charchgate Railway station) रेल्वे स्टेशनवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्त्वात भाजपनं (bjp Protest) आंदोलन केलं आहे.

घाटकोपरमध्ये (Ghatkoper) भाजप कार्यकर्ते स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी अडवले. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये भाजपच्या वतीने लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी भाजप कार्यकर्ते विना तिकीट प्रवास करुन आंदोलन करणार असल्याचं समजातच कार्यकर्ते स्टेशनवर जाऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करावी या मागणीसाठी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

तसंच लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे, असं दरेकर म्हणालेत.

आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Mumbai local