• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यातून आनंदाची बातमी! कोविड रुग्णांमध्ये विक्रमी घट, 50 दिवसांत 53 हजार रुग्ण कोरोनामुक्त

पुण्यातून आनंदाची बातमी! कोविड रुग्णांमध्ये विक्रमी घट, 50 दिवसांत 53 हजार रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

Corona Cases Pune: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona cases) संख्येत सातत्यानं घट होतं आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या 56 हजारावर पोहोचली होती.

 • Share this:
  पुणे, 09 जून: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona cases) संख्येत सातत्यानं घट होतं आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या 56 हजारावर पोहोचली होती. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत (Corona virus 2nd wave) पुण्यात कोरोना रुग्णांची बरीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर मागील 50 दिवसांत शहरात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 52 हजार 847 ने कमी झाली आहे. आता शहरात केवळ 3 हजार 699 सक्रीय रुग्णसंख्या आहे. त्यामुळे शहरात सध्या 8 हजाराहून अधिक बेड शिल्लक आहेत. पण सध्या महाराष्ट्रात अनलॉकला (Unlock) सुरुवात केली असल्यानं पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरात 18 एप्रिल 2021 रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता. या दिवशी शहरात एकूण सक्रिय रुग्णांची 56 हजार 546 वर पोहोचली होती. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. पण दरम्यान राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पुण्यात कोरोनाचा आलेख घसरायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील 50 दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे. 28 एप्रिल 2021 रोजी उपचाराधिन असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या 10 हजार 398 इतकी होती. त्यानंतर ही संख्या मागील 40 दिवसांपासून सातत्याने कमी होत गेली आहे. सध्या पुणे शहरात केवळ 3 हजार 699 सक्रिय रुग्ण उरले आहेत. यातील 1 हजार 969 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 1 हजार 730 रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या 8 हजार 229 खाटा रिकाम्या झाल्या आहेत. हे ही वाचा-मुंबईने करून दाखवलं! 105 दिवसांनंतर पहिल्यांदाच मिळाला मोठा दिलासा असं असलं तरी आरोग्य शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे. कोरोना विषाणूची तिसरी लाट अत्यंत संसर्गजन्य असून याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्येत घट होत असली तरी येणाऱ्या संभाव्य धोक्याला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: