पुणे, 13 मार्च : अभिनेत्यांचं जग वेगळंच असतं..त्यांचं राहणीमान...खाणं-पिणं सर्वकाही उंची असतं, असं आपल्याला वाटत असतं. मात्र अनेक कलाकार हे शून्यातून आपलं जग उभं करतात. बॉलिवूडमधील जॅकी दादा हादेखील त्यापैकी एक! (Jackie Shroff reached Pune as the grandmother of a housemaid passed away)
सध्या देशभरात जॅकी श्रॉफचं मोठं कौतुक होतं आहे. त्यामागील कारणंही तसंच काहीसं आहे. जॅकीच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या आजीचं पुणे जिल्ह्यातील मावळ येथील पवनानगर येथे निधन झालं. याबद्दल कळताच घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जॅकी दादा पुण्याला पोहोचला.
दिपाली तुपे नावाच्या या महिला जॅकी दादाच्या घरात अनेक दिवसांपासून काम करतात. त्यांची आजी तान्हाबाई ठाकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. याबद्दल कळताच आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ स्वत: तिच्या आजीच्या घरी पोहोचले. (Jackie Shroff reached Pune as the grandmother of a housemaid passed away)
हे ही वाचा-अक्षय कुमारला बायकोनं दिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार; घटस्फोट रोखण्याचा दिला...
जॅकी श्रॉफ आज इतका प्रसिद्ध आहे. संपत्तीदेखील अमाप आहे. मात्र त्याचं बालपण मात्र सर्वसाधारण परिस्थितीत गेलं आहे. जॅकी श्रॉफ यांचं बालपण एका चाळीत गेलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मेहनतीने त्यानं आज संपत्ती उभी केली आहे. पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकीचा बंगला आहे. अनेकवेळा तो तेथे मुक्कामाला जातो. तो काही दिवसांपूर्वी मावळला गेला होता. त्यावेळी दिपाली यांच्या आजीचं 100 व्या वर्षी निधन झाल्याचं कळताच त्याने दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. अगदी साध्या मात्र आपल्या माणसाप्रमाणे तो त्यांच्या घरी गेला. जमिनीवर बसला आणि दिपालीच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Jackie shroff, Pune, Star celebraties