मुंबई, 12 मार्च: बॉलिवूडचं स्टार जोडपं ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) त्यांच्या विनोदी स्वभावासाठी (Funny Nature) ओळखले जातात. अनेकदा ते एकमेकांशी गंमत करताना दिसतात. अलीकडेच ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने सोशल मीडियावरील आयुष्य आणि वास्तवातलं आयुष्य यातील फरक स्पष्ट केला आहे. यातील एका फोटोत ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार कॅमेऱ्याकडे पाहून अगदी आनंदाने पोज देताना दिसत आहे. तर दुसर्या एका फोटोत ट्विंकल खन्ना अक्षयचं नाक दाबून त्याला मारत असल्याची पोज दिली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.
या पोस्टच्या माध्यमातून ट्विंकलने एक जोडपं म्हणून इतके दिवस एकत्र राहिल्याचं रहस्य उलगडलं आहे. तिने या घटस्फोटापासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितलं आहे. ट्विंकल खन्नाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, " "इन्स्टाग्रामवरील जोडपं आणि वास्तवातील जोडपं" तिने पुढं सांगितलं की, "ज्याप्रमाणे आम्ही कॅमेर्यासमोर पाहून हसत आहे, त्याप्रमाणे जर आपण एकमेकांकडे पाहून हसलो, तर आयुष्यात घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. #SmileOkPlease'
View this post on Instagram
ट्विंकलच्या पोस्टनंतर अनेकांनी या फोटोवर मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या फोटोवर सिकंदर खेरनेही एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रिया देताना ट्विंकलला उद्देशून लिहिलं की,'तु त्याला सतत मारतेस का?' या फोटोवर अक्षय आणि ट्विंकल खन्नाच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत असून अनेकांनी या जोडीचं कौतुक केलं आहे. गुरूवारी अक्षयने ट्विंकलसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने सुट्ट्यांची मजा घेत असल्याचं सांगितलं होतं. हे जोडपं सुट्ट्या साजऱ्या करायला कुठे गेलं आहे, हे अद्याप त्यांनी सांगितलं नाही.
हे ही वाचा-..तर ‘आनंद’मध्ये राजेश खन्ना ऐवजी धर्मेंद्र झळकले असते; काय होता तो किस्सा?
यापूर्वी 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात अक्षयने खुलासा केला होता की, जेव्हा तो ट्विंकलला भेटला, त्यावेळी त्याचे सलग 14 चित्रपट फ्लॉप गेले होते. आपल्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक गोष्टींच श्रेय त्याने ट्विंकलला दिलं आहे. तर अक्षय आणि ट्विंकलने 17 जानेवारी 2001 रोजी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला नुकतीच 20 वर्षे झाली आहेत. तसेच त्यांना दोन मुलंही झाली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood News, Twinkle khanna