मराठी बातम्या /बातम्या /देश /

नराधमानं क्रूरतेची हद्दच केली पार; बलात्कारानंतर पीडितेच्या छातीवर चाकूनं कोरलं स्वतःचं नाव

नराधमानं क्रूरतेची हद्दच केली पार; बलात्कारानंतर पीडितेच्या छातीवर चाकूनं कोरलं स्वतःचं नाव

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.

Crime News: पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार (rape on minor girl) केला आहे.

    बेतिया, 26 ऑगस्ट: मैत्रिणीच्या चुलत भावानं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार (rape on minor girl) केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या छातीवर आपलं नावं चाकूनं कोरलं (carved own name on victims chest with knife) आहे. तसेच याचा व्हिडीओ (Shoot Obscene video) बनवला आहे. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर तब्बल नऊ महिने अत्याचाराच्या परिसीमा गाठल्या आहेत. नेमकी घटना काय आहे? संबंधित घटना बिहार (Bihar) राज्याच्या बेतिया (Bettiah) जिल्ह्यातील रामनगर येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये आपली मैत्रिण आर्या सिंह हिच्या घरी गेली होती. यावेळी मैत्रिणीचा चुलत भाऊ शुभम गुप्ता ऊर्फ सन्नी यानं बळजबरी करत पीडितेवर बलात्कार केला. तसेच बलात्कार झाल्यानंतर आरोपी शुभमनं चाकूनं पीडितेच्या छातीवर स्वत:चं नाव देखील कोरलं आहे. शिवाय संबंधित घटनेचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. हेही वाचा-दोस्तीत कुस्ती करणाऱ्या मित्राचा खेळ खल्लास; नागपुरात तरुणाचा असा काढला काटा या फोटो आणि व्हिडीओच्या आधारे आरोपीनं पीडितेसोबत तब्बल 9 महिने अत्याचार केला आहे. तसेच पीडितेला घरून पैसे आणून देण्यासाठी दबाब देखील टाकला जात होता. यामुळे पीडितेनं आपल्याच घरात चोरी करून आरोपीला 50 हजार रुपयांची रोकड आणि काही दागिने दिले आहे. तरीही तिच्यासोबत होणारा अत्याचार थांबला नाही. पण गेल्या महिन्यात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांकडे दिल्लीला गेल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. हेही वाचा-13 वर्षीय भावाला PORN VIDEO दाखवायची बहिण; पुढे जे घडलं त्यानं मुंबई हादरली यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी शुभम गुप्ता ऊर्फ सन्नी, मैत्रिण आर्या सिंह यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, संबंधित घटना एक वर्षापूर्वीची आहेत. त्यामुळे या घटनेचा बारकाईनं तपास केला जात आहे. तसेच पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Rape on minor

    पुढील बातम्या