Home /News /pune /

आजपासून तीन दिवस राज ठाकरेंचा पुण्यात मुक्काम, अॅक्शन मोडमध्ये असलेले ठाकरे घेणार शाखाध्यक्षांच्या बैठका

आजपासून तीन दिवस राज ठाकरेंचा पुण्यात मुक्काम, अॅक्शन मोडमध्ये असलेले ठाकरे घेणार शाखाध्यक्षांच्या बैठका

Raj Thackeray In Pune: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (maharashtra navnirman sena) अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुन्हा एकदा तीन दिवसीय पुणे (Pune Visit) दौऱ्यावर आहेत.

    पुणे, 28 जुलै: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून पुन्हा एकदा तीन दिवसीय पुणे (Pune Visit) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 42 प्रभागात शाखाध्यक्षांच्या बैठका घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे प्रत्येक शाखाध्यक्षाशी वन टू वन (One to One) बोलणार आहेत. विशेष म्हणजे आजपासून सुरु होणारा पुणे (Pune) दौरा राज ठाकरे यांचा 15 दिवसाच्या आत हा दुसरा तीन दिवसाचा दौरा आहे. गेल्या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख आदींशी चर्चा केली. या दौऱ्यात राज ठाकरे हे स्वतः पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती (Interview) घेणारेत. या मुलाखती नवी पेठेतील पक्षाच्या कार्यालयात होणार असून थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यालयात दाखल होणार आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधातल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचा मोठा निर्णय आजपासून म्हणजेच 28 जुलै ते 30 जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्‍चीत करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान शाखा अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. राज ठाकरेंचा दौरा पुणे मनसेला नवसंजीवनी देणार का? नाशिक (Nashik) पाठोपाठ राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या (Pune municipal corporation election) तयारीसाठी नव्यानं पक्षबांधणीसाठी राज ठाकरे हा पुणे (Pune) दौरा करत असल्याचं मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pune, Pune election, Raj Thackeray

    पुढील बातम्या