जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / टोल का फोडला? अमित ठाकरेंसोबत तिथं नेमकं काय घोडलं? राज ठाकरे स्पष्टच बोलले VIDEO

टोल का फोडला? अमित ठाकरेंसोबत तिथं नेमकं काय घोडलं? राज ठाकरे स्पष्टच बोलले VIDEO

(राज ठाकरे आणि अमित ठाकरे)

(राज ठाकरे आणि अमित ठाकरे)

‘अमित जेव्हा टोलनाक्यावर पोहोचला होता तेव्हा त्याचा फास्ट टॅग होता, टॅग असून सुद्धा त्याला थांबवलं’

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 26 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जाताना टोल नाक्यावर अडवल्याने मोठा वाद झाला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोडही केली. नेमकं त्यावेळी काय घडलं आणि मनसेसैनिकांनी टोल का फोडले होते, याबद्दलचा खुलासा खुद्द राज ठाकरेंनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

News18लोकमत
News18लोकमत

‘अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे, तो काही टोल फोडत चालला असं काही नाही. एखाद्या टोल नाक्यावर तो प्रसंग घडला. अमित जेव्हा टोलनाक्यावर पोहोचला होता तेव्हा त्याचा फास्ट टॅग होता, टॅग असून सुद्धा त्याला थांबवलं. त्याने सांगितलं की सगळे टोल भरलेले आहे. त्यानंतर काही फोनाफोनी झाली, त्या व्यक्तीचा वॉकीटॉकी सुरू होता. त्यावर समोरील व्यक्ती हा उद्धटपणे बोलला. आता समोरून आलेल्या अॅक्शनला ती रिएक्शन होती. हे काही टोल फोडत चालणे असं काही नाही’ असा खुलासा राज ठाकरेंनी केला.

जाहिरात

‘मुळात भाजपने यावर बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती, त्याचं काय झालं यावर बोलावं. नेहमी टोलचे कंत्राट हे बहीस्कर नावाच्या मानसाला मिळतात हा कुणाचा लाडका आहे? हा कुणाचा माणूस आहे. मुळात समृद्धी महामार्गावर झालेली घटना आहे, या मार्गावर रस्ता बनवताना दोन्ही बाजूने फेन्सिंग टाकणे गरजेचं आहे, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तसं केलं आहे. पण समृद्धी महामार्गावर तसं झालं नाही, 400 लोकांचा बळी गेला आहे, याची जबाबदारी भाजप घेणार का? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला. ( सत्तेत पवारांची पहिली टीम सामील, लवकरच..,राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?) ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरू आहे. मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या सारखं दुर्देव नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव न घेता टीका केली. तसंच अमितवर होत असलेले आरोप हे तो राजकारणात येत असल्याने होतायत आणि आरोप, टीका होतच राहणार असंही राज ठाकरे म्हणाले. ‘भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. कोणी कोणाला भेटलं की युत्या आघाड्या होत नसतात. आता मी बाळासाहेबांच्या एका पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो. तिथं शरद पवार होते. म्हणजे काय युती झाली का? असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात