जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / raj thackeray : सत्तेत पवारांची पहिली टीम सामील, लवकरच..,राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?

raj thackeray : सत्तेत पवारांची पहिली टीम सामील, लवकरच..,राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?

(राज ठाकरे)

(राज ठाकरे)

‘70 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा करणाऱ्यासोबत युती आघाडी केल्या जातात. अजित पवार भाजपसोबत गेले, राष्ट्रवादीची पहिली टीम गेली. सगळी मिलीभगत आहे’

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : ‘70 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा करणाऱ्यासोबत युती आघाडी केल्या जातात. अजित पवार भाजपसोबत गेले, राष्ट्रवादीची पहिली टीम गेली. सगळी मिलीभगत आहे. अजूनही होर्डिंग वर शरद पवारांचा फोटो आहे. सत्तेत पवारांची पहिली टीम सामील झाली आहे, तर दुसरीही लवकरच होईल. अजित पवारांना जेलमध्ये टाकतो म्हणणारे एकत्र आहेत. जेलमध्ये टाकणार म्हणणाऱ्यांनी अजित पवारांसोबत युती केली, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. नुकतंच अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जाताना टोल नाक्यावर अडवल्याने मोठा वाद झाला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोडही केली. याबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, अमित महाराष्ट्रभर दौरा करतोय आणि तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. त्या गाडीवर फास्टटॅग होता, त्यानंतरही थांबवून ठेवलं होतं. त्यावेळी तो समोरचा माणूस उद्धट बोलला. त्यावर आलेली ती रिअॅक्शन होती’ असा खुलासाही राज ठाकरेंनी केला.

News18लोकमत
News18लोकमत

‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरू आहे. मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या सारखं दुर्देव नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव न घेता टीका केली. तसंच अमितवर होत असलेले आरोप हे तो राजकारणात येत असल्याने होतायत आणि आरोप, टीका होतच राहणार असंही राज ठाकरे म्हणाले. भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं? प्रत्येकवेळी टोलचा ठेका म्हैसकर नावाच्या व्यक्तीला मिळतात. हे मिळतात कसे, कोण आहे हा, कोणाचा लाडका आहे हा. टोलची प्रकरण काय आहे? मुंबई-पुणे एक्सप्रेस वे प्रमाणे समृद्धीवर फेन्सिंग कधी लावणार? जनावर आडवी येतात, माणसं मरतात. त्यापूर्वीच टोल लावला आहे. रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत. फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. मग तरीही आपण टोल का भरतोय अशा शब्दात संताप व्यक्त केला. ‘भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. कोणी कोणाला भेटलं की युत्या आघाड्या होत नसतात. आता मी बाळासाहेबांच्या एका पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो. तिथं शरद पवार होते. म्हणजे काय युती झाली का? असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात