• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • चिंता करण्याची गरज नाही! पुण्यातील Zika virus रुग्णाबाबत मिळाली महत्त्वाची अपडेट

चिंता करण्याची गरज नाही! पुण्यातील Zika virus रुग्णाबाबत मिळाली महत्त्वाची अपडेट

कोरोनानंतर राज्यात झिका व्हायरसनेही (Zika virus) शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली.

 • Share this:
  पुणे, 01 ऑगस्ट : कोरोनाव्हायरस (Coronavirus) पाठोपाठ राज्यात झिका व्हायरसनेही (Zika virus) शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली (Zika virus in Maharashtra). ज्या पुण्यात (Pune) कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण (Pune zika virus) सापडला तिथंच झिका व्हायरसचाही पहिला रुग्ण सापडला. आता नव्या महासाथीला सुरुवात होते की काय?, अशीच भीती सर्वांना वाटू लागली. पण आता चिंता करण्याची काहीच गरज नाही. राज्यातील पहिल्या झिका व्हायरस रुग्णाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे.   झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसंच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. आता हा रुग्ण पूर्णपणे ठिक आहे" हे वाचा - कोरोनाव्हायरसनंतर राज्यात Zika virus चं संकट; काय आहेत याची लक्षणं? झिका हा आजार डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराप्रमाणे एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरतो.  यासाठी बाधित क्षेत्रांमध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले असून कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात लोकसहभाग घेण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहेत. बाधित भागातील डासोत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजवणे, वाहती करणे,  योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे तसेच घरगुतीसाठवलेल्या पाण्यामध्ये अळीनाशकाचा वापर  करणे, बाधित भागात धुरळणी करणे इत्यादी कृती योजना सुरु करण्यात आल्या आहेत. झिका व्हायरसची लक्षणं आणि धोका झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. 1950 पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. ताप, सांधेदुखी, शरीरावर चट्टे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात. हे वाचा - कोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत. मार्च 2016पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे
  Published by:Priya Lad
  First published: