• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Covid-19 Third Wave : कोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Covid-19 Third Wave : कोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) निश्चितपणे येणारच, असा दावा सीएसआयआरने (CSIR) केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : देशभरात कोरोनाव्हायरसची प्रकरणं पुन्हा वाढत आहेत. कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येणार की नाही याबाबत दररोज अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. यादरम्यान सीएसआयआरने (CSIR) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (Corona Third Wave) मोठी माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनी सांगितलं, कोरोनाची तिसरी लाट निश्चितपणे येणारच. पण कधी येणार आणि त्याची लक्षणं काय असणार याचा अंदाज लावू शकत नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार डॉ. मांडे यांनी सांगितलं, ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेने पुढील लाट पाहिली आहे. आपल्याला एक संरक्षित दृष्टिकोन ठेवावा लागेल. पुढील लाट येण्याची शक्यता आहे. पण कशी आणि कधी हे अद्याप माहिती नाही. व्हायरसचा नवा म्युटंटं किंवा कोरोना नियम शिथील केल्यानं हे होऊ शकतं. हे वाचा - कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिअंट' ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यू लसीकरण आणि मास्कचा वापर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यात मदत करू शकतं.  कोरोना लस पूर्णपणे काम करते आहे, याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. सध्या तिसऱ्या लाटेविरोधात लशीलाच एकमेव शस्त्र मानलं जातं आहे. सर्वांनी लवकरात लवकर लस घ्यावी जेणेकरून तिसऱ्या लाटेशी सामना करणं सोपं होईल, असा सल्लाही डॉ. मांडे यांनी दिला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: