मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील तरुणाला मुंबईतील दोघांनी फसवलं; संचालक पद देण्याच्या बहाण्यानं 30 लाखांचा गंडा

पुण्यातील तरुणाला मुंबईतील दोघांनी फसवलं; संचालक पद देण्याच्या बहाण्यानं 30 लाखांचा गंडा

Crime in Pune: पुण्यातील एका नामांकित कंपनीत संचालक (Director) पद देऊन भविष्यात मोठा आर्थिक फायदा (Financial benefits) मिळवून देण्याचं आमिष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे.

पुणे, 07 जुलै: पुण्यातील (Pune) एका नामांकित कंपनीत संचालक (Director) पद देऊन भविष्यात मोठा आर्थिक फायदा (Financial benefits) मिळवून देण्याचं आमिष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळी आमिषं दाखवून फिर्यादीला तब्बल 30 लाख रुपयांना गंडा (30 Lakh Fraud) घातला आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीनं पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

अशिष रामचंद्र काळे असं 43 वर्षीय फिर्यादी व्यक्तीचं नाव असून तो पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी फिर्यादीची ओळख मुंबईतील (Mumbai) गोरेगाव येथील रहिवासी असणाऱ्या प्रतिम आनंद सरया आणि आनंद बकलेश सरया या दोघांशी झाली होती. आरोपींनी फिर्यादीस गि शुभर लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर (Non Executive director)हे पद देऊन भविष्यात आर्थिक फायदा मिळवून देण्याच आमिष दाखवलं.

हेही वाचा-प्रिय ग्राहक, अपना जनता बँकेतून मिळवा लोन;पोलिसांनी सांगितलं मेसेजमागचं गौडबंगाल

आरोपींनी फिर्यादीला नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर पदही देऊ केलं. तेही नावापुरतं. नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर पदावर विराजमान होऊन एक वर्ष झालं तरी कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा झाला नाही. त्यामुळे फिर्यादी काळे यांनी आरोपीकडे आपल्या पैशाची मागणी केली. पण आरोपींनी पैसे परत द्यायला नकार दिला आणि त्यांची फसवणूक केली.

हेही वाचा-सामान्यांना ऑनलाईन लुबाडणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, अशिष काळे यांनी लष्कर पोलिसांत प्रतिम आनंद सरया आणि आनंद बकलेश सरया या दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Crime news, Financial fraud, Pune