मुंबई, 6 जुलै : सामान्यांना आवश्यक असणाऱ्या आणि सहजासहजी न मिळणाऱ्या वैद्यकीय वस्तू (Medical things and services) आणि सेवा पुरवण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा (International gang) मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं (Mumbai Police's cyber cell) पर्दाफाश केला आहे. सामान्यांच्या सोशल मिडियावर लक्ष ठेऊन त्यांना हव्या असणाऱ्या वस्तूंसाठी ही टोळी फोन करत असे. ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन यासारख्या अनेक गोष्टींचा पुरवठा करण्याच्या बहाण्याने अनेकांना या टोळीनं लुटल्याचं सिद्ध झालं आहे.
कोरोनाची दुसरी लाट ऐन भरात असताना कोरोना झालेल्या नागरिकांना ऑक्सिजन बेड मिळत नसत. रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा होता, तर ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठीही धावपळ करावी लागत असे. त्या काळात ही टोळी अशा गरजवंत नागरिकांना हेरून त्यांच्याशी संपर्क करायची आणि माफक दरात या गोष्टींचा पुरवठा करण्याची हमी द्यायची. नागरिक त्यासाठी पैसे भरत असत, पण त्यांना कायमस्वरूपी या वस्तूंची वाटच पाहात राहावं लागत असे. कारण पैसे मिळाल्यानंतर ही टोळी पुढे काहीच प्रतिसाद द्यायची नाही. सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण ६ जणांना अटक केली असून ते सर्व उच्च शिक्षित आहेत. यातील बहुतांश जण हे बिहारच्या नक्षलग्रस्त भागाताील असल्याची माहिती आहे. जमतारा सारख्या वेबसिरीज प्रमाणे या टोळीने देखील त्यांचे काॅल सेंटर थाटले होते…
हे वाचा -गुरुजी वर्गातच दारू पिऊन झाले तर्राट, चक्क टेबलाखालीच झोपले, नाशिकचा VIDEO
टोळीचे कारनामे
या टोळीने अनेक मोठ्या कंपन्या, रुग्णालयं आणि काही राज्यांच्या नावे बोगस जाहीराती तयार केल्या होत्या. प्राथंमिक तपासानुसार आतापर्यंत या टोळीनं 210 जणांची फसवणूक केल्याचं दिसून आलं आहे. ही टोळी सतत मोबाईल नंबर आणि बँक खाती बदलत राहायची. आतापर्यंत एकूण 32 बनावट खाती जप्त करण्यात आली आहेत. या टोळीनं आतापर्यंत सुमारे 60 लाख रुपये लुबाडल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्र आणि बिहारसोबत या टोळीचे धागेदोरे कोलकात्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Mumbai Poilce