मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO: भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, पुण्यातील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO: भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, पुण्यातील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Pune youth stabbed with sharp weapon: पुण्यातील एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune youth stabbed with sharp weapon: पुण्यातील एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune youth stabbed with sharp weapon: पुण्यातील एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे, 16 मे: पुण्यात (Pune) भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने वार (attack on Youth with sharp weapon)  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील नऱ्हेगावात (Narhe Village, Pune) अज्ञात टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले आहे. या हल्ल्यात 32 वर्षीय सुमित नाना वैराट (Sumeet Vairat) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident caught in cctv) झाली आहे.

ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झील कॉलेज चौकात घडली. नऱ्हेगावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा अज्ञात तरुणांनी एकत्र जमून सुमित वैराट या तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. अंगावर वार होत असताना जवळच्या इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी अवस्थेत सुमितला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्याचा जीव वाचला असून त्याला उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुल्लक कारणावरुन कुटुंबातील 4 जणांवर चाकू हल्ला; LIVE VIDEO आला समोर

या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. पूर्ववैमस्यातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे,सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, कुलदीप संकपाळ या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून दोन आरोपींना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली असून सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

First published:

Tags: Cctv, Crime, Pune