मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune University: परीक्षा ऑफलाईन होणार! विद्यार्थ्यांची चिंता वाढली

Pune University: परीक्षा ऑफलाईन होणार! विद्यार्थ्यांची चिंता वाढली

विद्यार्थ्यांचं पहिलं सत्र पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनं (Online Exam) गेलं आहे. अशात आता महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता परिक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.

पुणे 5 फेब्रुवारी : मार्च महिन्यापासून कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. याचा  फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. महाविद्यालयं आणि शाळांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं पहिलं सत्र पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनं (Online Exam) गेलं आहे. अशात आता परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर येत असल्यानं महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता परिक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं (Savitribai Phule Pune University) अंतिम वर्ष आणि बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईनच घेतल्या आहेत. त्यामुळे, या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल, ल्रॅपटॉप, टॅब आणि कॉमप्युटरवर परीक्षा दिल्या. त्यामुळे, परीक्षेवेळी अनेक गैरप्रकार झाले. अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र बसून पेपर सोडवले, तर अनेकांनी गुगलच्या मदतीनं परीक्षा दिली. याचा परिणाम म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास 30 टक्क्यांची वाढ झाली.

बॅकलॉग परीक्षेच्या वेळी तांत्रिक अडचणी कमी होण्यासाठी आणि गोंधळ टाळण्यासाठी प्रॉक्टोरड पद्धत वापरली गेली. मात्र, तरीही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी पाहून आणि चिटींग करून पेपर सोडवल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. अशात आता पुणे विद्यापीठ पहिल्या सत्राच्या परीक्षांचं (First Semester Exams) नियोजन करत आहे. विद्यार्थी मात्र ऑनलाईन परीक्षाच घ्यावी, अशी मागणी करत आहेत.

महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन न होता प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये होण्याची शक्यता आहे. अशात आता पुढील आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे, या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं विद्यार्थ्यांसाठी महत्तवाचं असणार आहे.

First published:

Tags: Exam, Savitribai phule pune university