पुणे, 15 जून : कोरोनापासून बचावाचं सर्वसामान्यांच्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क (Mask). मास्क हा आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहे. सर्जिकल, एन-95, कापडी मास्कचा वापर केला जातो. लोक आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या डिझाइनाचाही मास्क वापरताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील एका कंपनीने असा मास्क (Pune based company make mask) तयार केला आहे, जो कोरोनाव्हायरसवर भारी पडणार आहे.
पुण्यातील थ्रिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (Thincr Technologies India Private Limited) हा मास्क तयार केला आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोनाव्हायरस निष्क्रिय होईल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology) दिलेल्या माहितीनुसार, या मास्क थ्रीडी प्रिंटेड (3D printed mask) आहे. या मास्कवर अँटीव्हायरल घटक वापरण्यात आला आहे, याला व्हारूसाइड्स virucides असंही म्हणतात.
हे वाचा - कोरोनामुळे बाळाला दूध पाजणं थांबवू नका; Corona positive मातांसाठी गाइडलाइन्स
हा लेप कोरोनाला निष्क्रिय करतो. यामध्ये सोडिअम ओलेफिम सल्फोनेट आधारित मिश्रणाचा वापर करण्यात आला. हा साबणात वापरला जाणारा एक घटक आहे. या लेपचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. त्यामुळे या मास्कच्या संपर्कात येताच मास्कच्या बाहेरच्या भागावरच व्हायरसचा खात्मा होतो.
थिंक्र टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेडचे संस्थापक शीतलकुमार जामबाद यांनी सांगितलं की, संक्रमण रोखण्यासाठी जगभरात मास्क मोठं हत्यार आहे. पण बहुतेक लोक वापरत असलेले मास्क हे घरीच बनवण्यात आलेले आहेत आणि त्यांची गुणवत्ताही कमी आहे. जास्तीत जास्त गुणवत्ता असलेला मास्क बनवण्याची गरज आम्हाला वाटली आणि आम्ही तसा मास्क तयार केला.
हे वाचा - अस्थींमधून कोरोना पसरतो? जाणून घ्या काय आहे सत्य
या मास्कला पेटंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर या मास्कचं उत्पादन वाढवून बाजारात आणलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Face Mask, Mask, Pune