Home /News /nagpur /

अस्थींमधून कोरोना पसरतो? अस्थीकलशांकडे नातेवाईकांनी फिरवली पाठ; जाणून घ्या काय आहे सत्य

अस्थींमधून कोरोना पसरतो? अस्थीकलशांकडे नातेवाईकांनी फिरवली पाठ; जाणून घ्या काय आहे सत्य

नागपुरात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झालीय. अस्थींमधून कोरोना पसरू शकतो अशी भीती या नातेवाईकांमध्ये निर्माण झाली आहे.

नागपूर, 15 जून: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविडमुळे मृत्यू (Death due to covid) झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता कुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, त्याच दरम्यान नागपुरातून एक मोठी बातमी आहे. नागपुरात (Nagpur) कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे अस्थीकलश आजही झाडावर लटकवलेल्या स्थितीत आहेत. इतंकच नव्हे तर काही ठिकाणच्या स्मशानभूमीतील लॉकरही अस्थीकलश (Asthi Kalash) ठेवल्याने फुल्ल झाले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या अस्थीकलशांकडे नातेवाईकांनी पाठ फिरवलीय. त्यामुळे नागपुरात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झालीय. अस्थींमधून कोरोना पसरू शकतो अशी भीती या नातेवाईकांमध्ये निर्माण झालीय. नागपुरात झाडांवर लटकवले अस्थीकलश नागपूरमध्ये कोविड मुळे मृत्यू झालेल्या अनेकांचे अस्थीकलेश आज ही दहनघाटावर लॉकरमध्ये पडून आहेत. काही ठिकाणी तर लॉकर हाऊसफुल झाल्याने अस्थीकलश झाडाला बांधून ठेवण्यात आले. नातेवाईकांनी अस्थीकलशाकडे पाठ फिरवल्याने हे स्थिती उद्भवल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूर बहुतांश दहन घाटावर असेच चित्र पाहायला मिळत आहे. कोविडच्या काळात मृत्यू भरपूर झाले पण वेगवेगळ्या कारणाने सामान्यतः लोक जसे अस्थी नेतात तसे कोविडमुळे मृत्यू झाल्याच्या बाबतीत पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे अस्थी ठेवायला असणारे स्मशानातील लॉकर ही अनेक घाटांवर हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना झाडांवर अस्थीकलश लटकत ठेवा लागत आहे. लाल, पांढरे, पिवळे कापड आज ही हे अस्थी कलश झाडावर बांधून आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली; मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा नागपूरच्या मानेवाडा घाटावर शहरातील एका मोठ्या भागातील अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. तिथली हि झाडे सध्या बरेच काही सांगून जातात. कापडामध्ये लटकत असणाऱ्या अस्थी कलशावर नावे लिहून ठेवण्यात आली आहेत. जेणेकरून त्यांचे नातेवाईक येतील आणि विसर्जन करतील. सध्या स्मशानघाटात आता कमी प्रेत येत आहे मात्र, कोविडच्या काळात इथे चितेनंतर चिता असायची. मात्र आता मृत्यू कमी झाले असले तरी अस्थी ठेवलेले लॉकर फुल असल्याचे घाट व्यवस्थापक संजय गौरे यांनी सांगितली आहे. नागपुरात मानेवाडा, गंगाबाई, मोक्षधाम, अंबाक्षरी, वैशाली नगर, सहकारनगर असे काही मुख्य घाट आहेत जिथे कोरोनावायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांचे अंतिम संस्कार जास्त झाले. घाटांवर अंत्यसंस्कार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी राख घेऊन जाण्याचे निर्देश आहेत. पण तसे बऱ्याच मृतकाच्या बाबतीत होऊ शकले नाही अनेक अस्थीकलशांना आप्तजन कोरोनाच्या धास्तीने आलेच नाही. अनेक ठिकाणी खूप काळ उलटून गेला तरी अनेक अस्थी कलश मात्र प्रवास करता येईल त्याच्या अपेक्षेत आहेत. तर काहींना नेणारेच उरले नाहीत ही पण शोकांतिका असे मत नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Nagpur

पुढील बातम्या