मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune : तरूण खेळाडूच्या करिअरला Jellyfish चा दंश, 7 वेळा करावं लागलं ऑपरेशन, Video

Pune : तरूण खेळाडूच्या करिअरला Jellyfish चा दंश, 7 वेळा करावं लागलं ऑपरेशन, Video

X
Jellyfish

Jellyfish Attack : पुण्यातील तरुण जलतरणपटूच्या स्वप्नांना जेलिफिश माशानं दंश केलाय. तिच्या हाताचं तब्बल सातवेळा ऑपरेशन करण्यात आलंय.

Jellyfish Attack : पुण्यातील तरुण जलतरणपटूच्या स्वप्नांना जेलिफिश माशानं दंश केलाय. तिच्या हाताचं तब्बल सातवेळा ऑपरेशन करण्यात आलंय.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

    पुणे, 11 जानेवारी : पुण्यातील तरुण जलतरणपटूच्या स्वप्नांना एका माशानं दंश केलाय. गीता मालुसरे असं या जलतरणपटूचं नावं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका स्पर्धेच्या दरम्यान गीताच्या हाताला जेलिफिश माशानं दंश केला. या चाव्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्या करिअरला ब्रेक लागला आहे.

    नेमकं काय घडलं?

    कर्वे नगर परिसरात राहणारे महेश मालुसरे यांचे गीता ही मुलगी आहे. सर्वसामान्य घरातील गीता तिला आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे लहानपणापासून स्विमिंग करण्याची आवड निर्माण झाली. त्यातच तिने करीयर करण्याचे ठरवले. यामध्ये तिनं अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.

    रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या एका स्पर्धेच्या दरम्यान तिच्या हाताला जेलिफिश माशानं दोन वेळा दंश केला. गीतानं त्यानंतरही जिद्दीनं ही स्पर्धा पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला. पण, तिच्या करिअरला यामुळे ब्रेक झालाय. माशानं दंश केलेल्या तिच्या हातावर एक, दोन वेळा नाही तर तब्बल 7 वेळा ऑपरेशन झालं आहे.

    IPL 2023 : पंत IPL 2023 खेळणार की नाही? सौरव गांगुलीनं दिलं उत्तर

    डिसेंबर महिन्यात इस्त्राईलला होणाऱ्या स्पर्धेत गीताला भाग घ्यायचा होता. सरावासाठी गीताने नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरीतल्या स्विमींग स्पर्धेत भागही घेतला. गीता या स्पर्धेत दुसरी आली. पण पोहताना पाण्यामध्ये जेलीफिशने तिच्या हाताचा चावा घेतला. आणि या चाव्याचा परिणाम असा झाला की गीताचा हातच निकामी झाला होता. सात शस्त्रक्रिया होऊन तिचा हात सुरक्षित आहे. आणखी थोडे दिवस तिला पोहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    देशातील पहिलीच केस

    या प्रकारची ही पहिलीच केस असल्याची माहिती गीतावर उपचार करणारे डॉक्टर अभिषेक बोस यांनी दिली. 'गीता आमच्याकडं उपचार करण्यासाठी आली त्यावेळी तिचं कसं ऑपरेशन करावं याबाबत आमच्याकडं काहीही नेमकं उत्तर नव्हतं. आम्ही अभ्यासातून ते उत्तर शोधलं आणि तिच्या हाताचं यशस्वी ऑपरेशन केलं.

    तिच्या हातामधील नाजूक नसांना जिथे जिथे आघात झाला होता ते सर्व ओपन करून तिच्या हातातील डॅमेज दूर करावे लागले. आम्ही सातवेळा गीताच्या हाताचं ऑपरेशन केलंय. तिला संपूर्ण बरं व्हायला आणखी काही दिवस लागतील. ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून यामधून नक्की सावरू शकेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

    गीताचा निर्धार कायम

    या मोठ्या आघातानंतरही गीता सकारात्मक आहे. तिचा निर्धार ढळलेला नाही. देशासाठी 'क्वीन ऑफ द ओशन' हा पुरस्कार मिळवण्याचं तिचं स्वप्न आहे.

    First published:

    Tags: Local18, Pune, Sports