मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : रिषभ पंत IPL 2023 खेळणार की नाही? सौरव गांगुली यांनी दिलं उत्तर

IPL 2023 : रिषभ पंत IPL 2023 खेळणार की नाही? सौरव गांगुली यांनी दिलं उत्तर

रिषभ पंतचा अपघात झाला होता, त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला फिट होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबतही गांगुली यांनी माहिती दिली

रिषभ पंतचा अपघात झाला होता, त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला फिट होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबतही गांगुली यांनी माहिती दिली

रिषभ पंतचा अपघात झाला होता, त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला फिट होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबतही गांगुली यांनी माहिती दिली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : टीम इंडियाचा हुकमी एक्का आणि विकेटकीपर रिषभ पंतचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतच्या पायाला फ्रॅक्चर होतं तर पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. पंतवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. या सगळ्यात पंत किती काळ मैदानापासून दूर राहणार असा प्रश्न होता.

आयपीएलसाठी मिनी ऑक्शन नुकतंच पार पडलं. आयपीएल साधारण एप्रिल महिन्यात असेल पंत दिल्ली संघाचं नेतृत्व करतो. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पंत आयपीएल खेळणार की नाही हा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

6 जानेवारी रोजी पंतच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला मैदानावर परत येण्यास 6 महिने लागू शकतात असा बीसीसीआयचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2023 मध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. आयपीएलमध्ये रिषभ पंत खेळणार की नाही याबाबत सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.

IPL 2023 : पंतच्या अपघातानंतर दिल्ली कॅपिटल्सची धुरा परदेशी खेळाडूच्या खांद्यावर?

ऋषभ पंत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळू शकणार नाही, असे दिल्ली कॅपिटल्स क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी खुलासा केला. कोलकात्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतला फिट होण्यासाठी अजून काही वेळ लागेल, असे सांगितले.

गांगुली म्हणाले की, रिषभ पंतच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसणार आहे. पंतकडे अजून बराच वेळ आहे. तो फक्त 23 वर्षांचा आहे. त्यामुळे तसं काळजी करण्याचं कारण नाही. पंतच्या गैरहजेरीत दिल्लीचा कर्णधार कोण होणार, या प्रश्नावर मात्र त्यांनी ठोस काही निर्णय दिला नाही. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही एवढंच त्यांनी सांगितलं.

Rishabh Pant : सचिनसाठी 'देवदूत' ठरलेला आता पंतसाठी मैदानात, ऋषभचं करिअर ट्रॅकवर येणार!

डेव्हिड वॉर्नरच्या नावाची चर्चा असल्याचंही त्यांनी यावेळी नकळत सांगितलं. अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येईल असं गांगुली म्हणाले. त्यामुळे आता दिल्लीची धुरा कोणाकडे जाणार आणि त्याचे परिणाम टीमवर कसे होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरू शकतं.

First published:

Tags: Cricket news, IPL 2023, IPL auction, Rishabh pant, Saurav ganguli