मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

फॅशन टेक्नॉलॉजी शिकत असलेल्या तरुणीनं रुग्णांसाठी तयार केलं मूव्हिंग टॉयलेट

फॅशन टेक्नॉलॉजी शिकत असलेल्या तरुणीनं रुग्णांसाठी तयार केलं मूव्हिंग टॉयलेट

NIFT या संस्थेत तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रत्यक्षा माझे (Pratyaksha Maze) नावाच्या विद्यार्थिनीने कोविड रुग्णांना उपयुक्त ठरेल, असं फिरतं शौचालय विकसित केलं आहे.

NIFT या संस्थेत तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रत्यक्षा माझे (Pratyaksha Maze) नावाच्या विद्यार्थिनीने कोविड रुग्णांना उपयुक्त ठरेल, असं फिरतं शौचालय विकसित केलं आहे.

NIFT या संस्थेत तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रत्यक्षा माझे (Pratyaksha Maze) नावाच्या विद्यार्थिनीने कोविड रुग्णांना उपयुक्त ठरेल, असं फिरतं शौचालय विकसित केलं आहे.

भोपाळ, 31 मे:   कोरोना संसर्गाने गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. मात्र गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. त्याप्रमाणे गरजेनुसार अनेक नवे शोध या काळात लागले. घरीच टेस्ट करता येण्यासारख्या किटपासून केवळ गुळण्या करून आरटी-पीसीआर टेस्ट करता येण्यापर्यंत अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावले. वेगवेगळी औषधं, नेझल स्प्रे देखील विकसित करण्यात आले आहेत. मात्र केवळ शास्त्रज्ञच शोध लावत आहेत असं नव्हे, तर अनेक तरुणही या कामात सक्रिय आहेत. तरूण वर्गही आपली कल्पनाशक्ती लढवून देशवासीयांना मदत करत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) या संस्थेत तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रत्यक्षा माझे (Pratyaksha Maze) नावाच्या विद्यार्थिनीने कोविड रुग्णांना उपयुक्त ठरेल, असं फिरतं शौचालय विकसित केलं आहे. या कामी तिला तिचे सिव्हिल इंजिनीअर (Civil Engineer) असलेल्या वडिलांची मदत झाली. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. भोपाळमधलं (Bhopal) माझे कुटुंब दीड महिन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झालं होतं. त्यात प्रत्यक्षाचे काका राजेश यांना हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. सात दिवस त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची (Oxygen Support) गरज भासली. त्या कालावधीत त्यांना टॉयलेटला जाणं खूपच त्रासदायक ठरलं. कारण ऑक्सिजनशिवाय त्यांना बेड सोडता येत नव्हता. शिवाय हॉस्पिटलमध्ये वॉर्ड खूप मोठे असतात. त्यात टॉयलेट-बाथरूम अगदी एखाद्या कोपऱ्यात असतात. शिवाय कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप असल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरताही भासते. 'काका हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा आमचं सगळं कुटुंबच आजारी होतं आणि विलगीकरणात होतं. काकांची समस्या पाहूनच माझ्या डोक्यात मूव्हिंग टॉयलेट (Moving Toilet) विकसित करण्याची कल्पना आली. त्यानंतर मी वडिलांशीही चर्चा केली. मी या टॉयलेटचं डिझाइन केलं आणि माझे वडील बृजेश यांची मोठी मदत मला त्यासाठी झाली. ते सिव्हिल इंजिनीअर आहेत. हे टॉयलेट बनवण्यासाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च आला,' अशी माहिती प्रत्यक्षाने दिली. हेही वाचा- “हॅलो, मी नरेंद्र मोदी बोलतोय”;तुम्ही कसे आहात?  हे मूव्हिंग टॉयलेट एखाद्या व्हीलचेअरप्रमाणे काम करतं. त्यात पाश्चात्य प्रकारचा म्हणजे कमोड टॉयलेट बसवलेला आहे. त्याला 80 लिटरचा ओव्हरहेड टँक (Overhead Tank) असून, 100 लिटरचा बॉटम टँक (Bottom Tank) आहे. त्याला फायबर शीटच्या साहाय्यानं आच्छादित करण्यात आलं असून सुरक्षिततेसाठी त्याच्या चाकांना लॉकची व्यवस्थाही करण्यात आली आहे. व्हीलचेअरप्रमाणे (Wheelchair) असल्याने हे मूव्हिंग टॉयलेट प्रत्येक पेशंटच्या बेडजवळ नेता येतं. एकदा टाकीत पाणी भरल्यानंतर हे टॉयलेट पाच-सहा पेशंटच्या बेडजवळ नेणं शक्य होऊ शकतं. वापर झाल्यानंतर ते टॉयलेटजवळ नेऊन वरच्या टाकीत नव्याने पाणी भरून आणि खालची टाकी साफ करून पुन्हा वापरता येऊ शकतं, अशी माहिती प्रत्यक्षाने दिली. हेही वाचा- धक्कादायक! आत्महत्येचा बनाव रचत अकोल्यात सरकारी कर्मचाऱ्याची हत्या एवढ्यावरच प्रत्यक्षा थांबलेली नाही. ज्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये तिचे काका अॅडमिट होते, त्या हॉस्पिटलला हे मूव्हिंग टॉयलेट ती दान करणार आहे. त्यामुळे तिथल्या गरजू रुग्णांना त्याचा उपयोग होणार आहे. गोदरेजचे उपाध्यक्ष बोमी गांधी यांनी ट्विट करून प्रत्यक्षाच्या निर्मितीची प्रशंसा केली आहे. त्यामुळे ही कल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या