जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती; 16 नवे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती; 16 नवे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती; 16 नवे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

येत्या काळात राज्यातील ऑक्सिजनचा प्रश्न मिटवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या काळात पुणे विभागात ऑक्सिजन निर्मितीचे एकूण 16 नवीन प्रकल्प उभारण्यात येणार (16 new oxygen plant) आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 31 मे: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (Lack of oxygen) देशात अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona patient death) झाला आहे. पण येत्या काळात राज्यातील ऑक्सिजनचा प्रश्न मिटवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या काळात पुणे विभागात ऑक्सिजन निर्मितीचे एकूण 16 नवीन प्रकल्प उभारण्यात येणार (16 new oxygen plant) आहेत. संबंधित प्रकल्प उभारणीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. हे प्रकल्प निर्धारित वेळेत सुरू झाल्यास त्यांना भांडवली खर्चासाठी 10 ते 20 टक्के अनुदान देण्याचंही राज्य सरकारने ठरवलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे. संबंधित ऑक्सिजन प्रकल्पातून दररोज जवळपास 200 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. प्रतिदिन 25 ते 50 टन ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लॅंट 31 डिसेंबरपर्यंत आणि 50 टन प्रतिदिन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प पुढील वर्षी जूनपर्यंत कार्यान्वित झाल्यास त्यांना भांडवली खर्चात 10 ते 20 टक्के अनुदान देण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. हे कमाल अनुदान 5 ते 10 कोटी रुपये इतकी असणार आहे. राज्यात ऑक्‍सिजन प्रकल्पाची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकारने मिशन ऑक्सिजनाचं स्वावलंब धोरण तयार केलं आहे. त्यात उद्योगांना ऑक्सिजन निर्मितीस प्रोत्यासहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील 7 ते 9  वर्षांत प्रकल्पाचा एकूण खर्च वसूल होऊ शकतो. कोरोना स्थितीमुळे ऑक्सिजन प्रकल्पाची संख्या वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सुतोवाचही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहेत. हे ही वाचा- जूनमध्ये कोरोनापासून मिळणार मोठा दिलासा? लसीकरणाचा वेगही वाढणार ऑक्सिजन प्रकल्प कुठे उभारले जाणार मिशन ऑक्सिजन अंतर्गत जेजुरीत दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर यवत, मरकळ आणि शिवणे याठिकाणी प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर  कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर सांगलीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्रकल्प उभारले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात