• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Pune bank robbery: शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा, कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास, घटनेचा CCTV

Pune bank robbery: शिरुरमधील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा, कोट्यवधींचे सोने आणि रक्कम लंपास, घटनेचा CCTV

महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा; कोट्यवधींचे सोने लंपास, घटनेचा CCTV

महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा; कोट्यवधींचे सोने लंपास, घटनेचा CCTV

Caught in camera robbery in Maharashtra Bank Pune district: पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात भरदिवसा बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे.

  • Share this:
पुणे, 21 ऑक्टोबर : बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा (robbery in Bank of Maharashtra) टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) पिंपरखेड (Pimperkhed) येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Bank robbery caught in CCTV) दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बँकेवर दरोडा टाकण्यात आल्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना महत्वाचा संदेश पाठवण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर सशस्त्र दरोडा पडला असून दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचं बोललं जात आहे. 5-6 दरोडेखोरांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. सदर गाडीतून आरोपी नगर दिशेला पळून गेले आहेत. शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करा. तसेच या वर्णाची गाडी आणि संशयित मिळून आल्यास अगर काही माहिती मिळाल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे. ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने सदरची गाडी व इसम पकडून ठेवावे असा संदेश पाठवण्यात आला आहे. मार्च महिन्यात चंद्रपूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रावर मार्च महिन्यात दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने लंपास केले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सकाळी स्थानिक नागरिकांना महाराष्ट्र बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली. त्यामुळे गावकऱ्यांना चोरीची शंका आली आणि त्यांनी वरोरा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली. लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले. तसंच या इमारतीच्या मागच्या बाजूला गॅस सिलिंडर पडून असल्याचे दिसून आले. या दरोड्यात प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे 6 लाखांची रोकड आणि 10 तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.
Published by:Sunil Desale
First published: