पुणे 02 जून : माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे. या शिखरावर चढताना अनेकदा गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येतात. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे शिपाई भूषण गरड हेदेखील एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी गेले होते. मात्र, भूषण गरड ब्रेनडेड झाले आहेत. चढाईच्या दरम्यान भूषण गरड यांच्या मेंदूला ॲाक्सिजनचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून नेपाळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. तीन दिवस त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच डॅाक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं आहे.आतड्यातील घाणीचा थेट मेंदूवर होतो परिणाम, गंभीर समस्येची ही असतात लक्षणं आतड्यातील घाणीचा थेट मेंदूवर होतो परिणाम, गंभीर समस्येची ही असतात लक्षणं ब्रेनडेड म्हणजे काय? हृदय आणि फुफ्फुस थांबलं की मृत्यू झाला असं अनेकांना वाटतं. पण जेव्हा मेंदूचं कार्य थांबतं तेव्हा मशीन्समार्फत या अवयवांचं काम सुरू राहतं. पण मेंदूच्या बाबतीत तसं होत नाही. मेंदूला गंभीर इजा होणं, मेंदूतील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचल्याने स्ट्रोक येणे किंवा हृदय बंद पडल्याने मेंदूला ऑक्सिजन आणि इतर आवश्यक घटकांचा पुरवठा न होणं यामुळे मेंदू मृत व्हायला सुरुवात होते, याला ब्रेनडेड म्हणतात. अशा रुग्णांचा मेंदू कार्य करणं थांबतो पण त्यांचं हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत असे अवयव काम करत असतात. फक्त हे रुग्ण स्वतःहून श्वासोच्छवास करू शकत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटर किंवा लाइफ सपोर्टवर ठेवलं जातं. ब्रेनडेड झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, सामान्य मृत्यूप्रमाणेच हा मृत्यूच असतो, असं तज्ज्ञ सांगतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.