जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी, 21 गुन्ह्यांचा लागला छडा

Pune : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी, 21 गुन्ह्यांचा लागला छडा

Pune : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी, 21 गुन्ह्यांचा लागला छडा

Pune Police busted Vehicle theft gang 77 लाखांची चोरीची वाहनं त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. ही टोळी शिरूर, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, बार्शी या तालुक्यातील शेतकऱ्यांची वाहनं चोरून नंतर ती चोर बाजारात विकायची.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 25 मे : पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा (Vehicle theft gang) पर्दाफाश केला आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमधूनही त्यांनी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 ट्रॅक्टरसह 14 चारचाकी, 6 बाईक, गाई आणि चोरीसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यांनी केलेल्या 21 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे. (वाचा- आरे दुग्ध वसाहतीचे CEO नथु राठोड ACBच्या जाळ्यात; झडतीत आढळल कोट्यावधींचं घबाड ) पुण्याच्या विविध तालुक्यांमध्ये वाहने चोरीला जाण्याच्या तक्रारींमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळं पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर एक खास पथक तयार करून याच्या तपासासाठी रवाना करण्यात आलं. दरम्यानच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेला एक गोपनीय माहिती मिळाली. यात शिरूर शहरातील तीन इसमांबाबत माहिती देण्यात आली.

जाहिरात

शिरूर शहरात राहणारे सतीश राक्षे, विनायक नाचबोणे आणि प्रवीण कोरडे यांच्याबद्दल पोलिसांना टीप मिळाली होती. हे तिघेही एकत्र असतात आणि काहीही काम धंदा करत नाहीत. मात्र त्यांच्याकडे ट्रॅक्टर, पिकअप अशा वेगवेगळ्या गाड्या दिसतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळं पोलिसांना या तिघांवर संशय होता. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळवत या तिघांवर कारवाई केली. सतीश याला शिरूरच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नाचबोणे आणि कोरडे यांच्यासह त्यांच्या आणखी काही साथीदारांनाही अटक केली. (वाचा- Pune : हत्या झालेल्या 75 वर्षीय वृद्धेवर हत्येपूर्वी आणि नंतरही लैंगिक अत्याचार ) पोलिसांनी यांच्याकडून चोरी केलेला तब्बल 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो, 1 स्कॉर्पिओ यासह 6 बाईक, 5 गायी असा मुद्देमाल जप्त केला. तसंच गॅस कटर, घरगुती गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, नट बोल्ट उघडण्याचे पान्हे जप्त केले आहेत. या सर्वांनी केलेले तब्बल 21 गुन्हे समोर आले आहेत. तब्बल 77 लाखांची चोरीची वाहनं त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. ही टोळी शिरूर, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, बार्शी या तालुक्यातील शेतकऱ्यांची वाहनं चोरून नंतर ती चोर बाजारात विकायची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात