Home /News /mumbai /

आरे दुग्ध वसाहतीचे CEO नथु राठोड ACBच्या जाळ्यात; घराच्या झडतीत सापडलं 3 कोटी 40 लाखांचं घबाड

आरे दुग्ध वसाहतीचे CEO नथु राठोड ACBच्या जाळ्यात; घराच्या झडतीत सापडलं 3 कोटी 40 लाखांचं घबाड

Nathu Rathod: नथु राठोड याला एसीबीने लाच घेताना अटक केल्यावर आज त्याच्या घराच्या झडतीत कोट्यावधींची रोकड सापडली आहे.

मुंबई, 25 मे: आरे दुग्ध डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड (Aarey Dairy CEO Nathu Rathod) यांना लाच मागितल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (ACB)ने सोमवारी अटक केली. या कारवाईनंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज नथु राठोड याच्या घराची झडती घेण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या झडतीत नथु राठोड याच्या घरी कोट्यावधींची रोकड (Crore rupees cash recovered) सापडली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नथु राठोड यांच्या घराची झडती घेतली. यावेळी त्याच्या घरातून अधिकाऱ्यांना तब्बल 3 कोटी 40 लाख रुपयांची रोकड आढळून आली. आरेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरात इतके मोठे घबाड आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. वाचा: पुण्यात हत्या झालेल्या 75 वर्षीय वृद्धेवर हत्येपूर्वी आणि नंतरही लैंगिक अत्याचार काय आहे संपूर्ण प्रकरण? फिर्यादी यानी आरे कॉलनी, युनिट 32, गोरेगाव मुंबई येथील आपल्या घराच्या दुरुस्तीच्या कामाची परवानगी मिळावी यासाठी नथु राठोड यांची भेट घेतली. यावेळी राठोड यांनी अरविंद तिवारी यांना भेटण्यास सांगितले. त्यावेळी अरविंद तिवारी याने नथु राठोड यांच्यावतीने फिर्यादीकडे 50,000 रुपयांची मागणी केली आणि ती स्वीकारताना सापळा रचून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नथु राठोड आणि अरविंद तिवारी यांना रंगेहात पकडले. नथु राठोड यांनी लाच मागितल्याप्रकरणी फिर्यादी यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे 14 मे रोजी लेखी तक्रार दिली होती. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या माहितीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना लाच घेताना रंगेहात अटक केली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अनिनियम 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अलका देशमुख, पोलीस निरीक्षक सुप्रिया नटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश चिंचकर, पोलीस निरीक्षक गणेश कानडे, किशोर शेवते, विक्रम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Mumbai

पुढील बातम्या