• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यात व्यापाऱ्यांना पोलिस, पालिकेचा दणका; 4 नंतरही दुकानं सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुण्यात व्यापाऱ्यांना पोलिस, पालिकेचा दणका; 4 नंतरही दुकानं सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

कोरोना निर्बंधांविरोधात बुधवारी पुण्यात व्यापारी, उपाहारगृह व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी पुण्यात प्रशासनाचे आदेश धुडकावून व्यापाऱ्यांनी चारनंतरही दुकाने (Shop) सुरु ठेवली.

 • Share this:
  पुणे, 05 ऑगस्ट: राज्यातील (Maharshtra State) 25 जिल्ह्यांतील (District) निर्बंध (Restrictions) शिथिल झाले आहेत. या वेळी निर्बंध शिथिल करताना दुकानांची वेळमर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील (Pune Lockdown) कोरोनाबाधितांची संख्या (Corona Virus) कमी असतानाही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना निर्बंधांविरोधात बुधवारी पुण्यात व्यापारी, उपाहारगृह व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी पुण्यात प्रशासनाचे आदेश धुडकावून व्यापाऱ्यांनी चारनंतरही दुकाने (Shop) सुरु ठेवली. दुकाने सुरू ठेवण्यासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी (Permission) मिळावी, या मागणीसाठी पुण्यात व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसंच व्यापारी दुकानांना वेळ वाढवून न दिल्याने व्यापाऱ्यांनी मंगळवारी घंटानाद आंदोलन केले. मात्र पोलीस आणि महापालिकेनं व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात चीनच्या संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती बुधवारपासून पुणे व्यापारी महासंघाने शहरातील सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी चारनंतर शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, बोहरी आळी, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता आदी भागांतील दुकाने चारनंतरही उघडी ठेवण्यात आली. मात्र, तुळशीबाग, शनिपार चौक भागातील दुकाने दुपारी चारच्या सुमारास बंद करण्यात आली होती. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे दुकाने संध्याकाळी चारनंतर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारपासून संध्याकाळी चारनंतर दुकाने सुरू ठेवण्याचं पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले. त्यानुसार बुधवारी शहराच्या मध्यभागातील आणि उपनगरांतील दुकाने संध्याकाळी चार नंतर सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुरु असलेल्या दुकानांचे तपशील घेऊन त्यांचे फोटो काढले. तसंत दुकानदारांना दुकानं बंद करण्यासही सांगितलं. दुकानदारांनी आदेशाचं पालन न केल्यानं पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानंही शहर आणि उपनगरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली. त्यामुळे कारवाई सुरु होताच संध्याकाळी सातच्या सुमारास पुण्यात सगळीकडे कडक बंद सुरु झाला.
  Published by:Pooja Vichare
  First published: