नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: कोरोना व्हायरसचा (Corona Virus) डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटचा प्रत्यक्ष संसर्ग क्षमता जाणून घेण्यासाठी सतत रिसर्च सुरु आहे. याच दरम्यान चीनमध्ये (China) केलेल्या एका अभ्यासात नवी माहिती समोर आली आहे. या अभ्यासात म्हटलं आहे की, सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीने अधिक व्हायरस असतात. अभ्यासात (Study) म्हटलं आहे की, कोरोनाचा मूळ वुहान व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य आणि धोकादायक आहे.
या व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकते, असं एका संशोधकाचे म्हणणं आहे. म्हणूनच हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करतो. चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना बाधितांवर संशोधन केलं आहे.
दुसरीकडे सद्यस्थितीत चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि टेस्टिंग-ट्रेसिंगचा वेग देखील वाढवण्यात आला आहे.
HBD Kajol: अजय-काजोलच्या अफेअरवर आई तनुजा यांची अशी होती प्रतिक्रिया; म्हणाल्या 'अजय दिसायला...'
WHO नं डेल्टा व्हेरिएंटवर व्यक्त केली चिंता
यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गजन्य संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. WHO ने म्हटलं होतं की, डेल्टा पॅटर्नशी संबंधित वाढीव प्रसारण क्षमतेमुळे प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि विशेषतः कमी लसीकरणाच्या संदर्भात आरोग्य पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येईल. डेल्टा व्हेरिएंटची संसर्गजन्य क्षमता आतापर्यंत ओळखल्या गेलेल्या इतर व्हेरिएंटच्या चिंते (VOC) पेक्षा खूप जास्त आहे. वाढलेली संसर्गजन्यता याचा अर्थ असा की येत्या काही महिन्यात डेल्टा व्हेरिएंट जगभरात प्रमुख स्वरुप बनणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona virus in india, Coronavirus