पुणे, 26 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus Second wave) संपूर्ण देशभरात अक्षरश: थैमान घातले. रुग्णांची संख्या इतकी वाढली की आरोग्य यंत्रणेवर ताण आला आणि सुविधा अपुऱ्या पडण्यास सुरुवात झाली. ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाला आणि अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) पूर्व तयारी केली आहे त्यानुसार आता गरज असल्यास नागरिकांना घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (oxygen concentrator)चा पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मिळालेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांचा वापर लायब्ररीच्या स्वरूपात कारणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या रुग्णांना घरी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासते अशांसाठी काही अटी व शर्ती निश्चित करून पुणे महापालिकेकडून त्यांना विनामूल्य ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी दिला जाणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णाची राहणाऱ्या पत्त्यासह पूर्ण माहिती आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून झाल्यानंतर पुन्हा उत्तम स्थितीत परत करण्यासाठीचा हमीपत्र, इतक्या गोष्टींच्या आधारावर विनामूल्य हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) May 26, 2021
Lockdownमध्ये सर्रासपणे नियमांचं उल्लंघन; पुणे पोलिसांनी धाड टाकून 18 बार, बिअर शॉप केले सील
पुणे महानगरपालिकेने एक अभिनव उपक्रम राबवण्याचे योजले आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत पुणे मनपाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राप्त झाले आहेत. ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुणे शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यासाठी देण्यात यावे यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना केली. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांना घरी किंवा रुग्णालयात वापरासाठी नेता येणार आहे.
रुग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी किंवा रुग्णालयामध्ये 7 दिवस 15 दिवस किंवा 30 दिवस विविध कॅपॅसिटीचा उदाहरणार्थ 5 लिटर किंवा 10 लिटरचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यास देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत.
अटी व शर्ती खालीलप्रमाणे
नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन
रूग्णाचा कोविड पॉझिटीव्ह रिपोर्ट किंवा संशयित कोविड
घरी डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करण्यास सांगितला आहे इ. इतंभुत माहिती
रुग्णांचे हमीपत्र (पुरविलेल्या नमुन्यात)
रुग्णांचा संपुर्ण निवासी पत्ता व त्याचा पुरावा, इलेक्ट्रिक बिल व आधार कार्ड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Oxygen supply, Pune