मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Police Murder News : हिंजवडी पोलीस स्टेशनच्या दारातच पत्नीचा केला खून, पुण्यात खळबळ

Pune Police Murder News : हिंजवडी पोलीस स्टेशनच्या दारातच पत्नीचा केला खून, पुण्यात खळबळ

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरामध्ये महिलेचा खून झाला आहे. आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरामध्ये महिलेचा खून झाला आहे. आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरामध्ये महिलेचा खून झाला आहे. आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

गोविंद वाकडे (पिंपरी चिंचवड), 12 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरामध्ये महिलेचा खून झाला आहे. आयटी कंपनीसमोरील फुटपाथवर महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान हा खून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर झाल्याने या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती. स्वाती राठोड असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वाती राठोड हिच्या पतीने चाकूने भोसकून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

स्वाती राठोड ही कामगार महिला असून ते हिंजवडी परिसरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी आली होती. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर झाल्याने याची जोरदार चर्चा होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन वरील फुटपाथवर हा खून झाला आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

video : पुण्यात भीषण अपघात; भरधाव कारची धडक अर्धा किमी कारसोबत फरफटत गेला

हिंजवडी फेज 2 येथील आय टी पार्क येथील फुटपाथवर खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. स्वाती राठोड नावाच्या महिलेच्या पतीने चाकू भोकसून तिचा खून केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशनदरम्यान वरील फुटपाथवर हा खून झाल्याची माहिती आहे.

एवढंच नाही तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा खून झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

हे दृश्य विचलित करू शकतं! व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीला बेदम मारहाण, जीव गेल्यावरच सोडलं, धक्कादायक VIDEO

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. खून केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे काम हिंजवडी पोलिसांकडून सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Murder news, Pune, Pune (City/Town/Village)