पुणे, 10 मार्च, गोविंद वाकडे : पिंपरी-चिंचवडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील काळेवाडी बीआरटी रोडवर एका कारचालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात धडक दिली. धडक दिल्यानंतरही या कारचालकाने वाहन थांबवले नाही. धडकेनंतर हा व्यक्ती कारसोबत फरफटत गेला. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघातामध्ये व्यक्ती गंभीर जखमी पाच मार्चरोजी हा अपघात झाला असून, या अपघाताचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीतील दृश्यांनुसार हा अपघात पहाटे सहाच्या सुमारास झाला. या अपघातामध्ये हा व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर अपघातग्रस्त व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील काळेवाडी बीआरटी रोडवर एका कारचालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात धडक दिली. pic.twitter.com/OGPGtgYFxb
— News18Lokmat (@News18lokmat) March 10, 2023
कारचालकाविरोधात गुन्हा दाखल या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात भादवी 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या घटनेला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अद्यापपर्यंत संबंधित कारचालकाला अटक करण्या आली नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.