पुणे, 9 मार्च : आजवर कधी ऐकलं आहे का, की एखाद्यानं मुलीबरोबरच्या प्रेमप्रकरणासाठी पोलिसांची मदत मागितली? हे कसं काय शक्य आहे असा तुम्ही विचार करत असाल. मात्र असंच काहीतरी झालं आहे खरं आणि तेही पुण्यात. पुणे पोलिसांनीही या तरुणाच्या मदतीची हाक ऐकून त्याला अगदी सडेतोड उत्तर दिलं. पुणे पोलिसांचं एक tweet सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झालं आहे. त्याचीच ही बातमी. (Pune news) ही बातमी पुण्याची आहे. पुणे पोलिसांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. एका व्यक्तीनं चक्क ट्विटरच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्तांकडे ‘काहीतरी करा’ अशी मदत मागितली. त्यावेळी पोलिसांनीही प्रतिसाद देत त्याला ट्विटरवरच उत्तर दिलं, ‘No means No. नाही याचा अर्थ नाही असाच होतो. (Pune CP on twitter) हेही वाचा Women’s Day 2021:तामिळनाडूची शाल,आसामाचा गमछा, महिला दिनी मोदींनी काय केली खरेदी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘लेट अस टॉक’ या उपक्रमांतर्गत ट्विटरवर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. यादरम्यानच एका व्यक्तीनं त्यांना आपल्या प्रेमप्रकरणाबाबत सांगितलं. सोबतच याप्रकरणी मदत करण्याचीही विनंती केली. (Pune CP Amitabh Gupta replies person in love on twitter) हेही वाचा VIDEO: नक्षलवाद्यांच्या गोटात महिला कमांडोंची धडक कारवाई; स्मारक केला उद्ध्वस्त यावर अमिताभ यांनी ट्विट केलं, ‘दुर्दैवानं तिच्या संमती आणि होकाराविना आम्ही तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. (Pune CP answers to person in love) तुम्हीसुद्धा तिच्या संमतीविना काही करू नका. ती पुढच्या काळात कधी हो म्हणाली तर आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. मात्र नाही याचा अर्थ नाही असाच होतो.’ (Pune CP responds person about love affair)
Unfortunately, without her consent, even we can’t be of any help. Nor should you do anything against her will. And if she does agree some day, you have our best wishes and blessings. #ANoMeansNo #LetsTalkCPPuneCity @PuneCityPolice https://t.co/aBrVTm0KI8
— CP Pune City Police (@CPPuneCity) March 8, 2021
पुणे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत त्यांची मतंही विचारात घेतली. पुणे पोलिसांचा हा उपक्रम सामान्यांचं म्हणणं आणि मतं समजून घेण्यासाठी सुरू झालेला आहे.