मराठी बातम्या /बातम्या /देश /

नक्षलवाद्यांच्या गोटात महिला कमांडोंची धडक कारवाई; नक्षली स्मारक केला उद्ध्वस्त, पाहा रोमांचक VIDEO

नक्षलवाद्यांच्या गोटात महिला कमांडोंची धडक कारवाई; नक्षली स्मारक केला उद्ध्वस्त, पाहा रोमांचक VIDEO

छत्तीसगडच्या जंगलात शिरून सुरक्षा दलाच्या महिला पथकाने महिला दिन एका अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. त्यांनी नक्षलग्रस्त भागात शिरून नक्षल स्मारक ( women commandos demolished Naxal monument) पाडलं आहे. त्याचा हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

रायपूर, 08 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध स्तरातील यशस्वी महिलांचा गौरव करण्यात आला. याच दिवशी सुरक्षा दलाच्या महिला कमांडोंनी पुरुषांच्या तोडीचं काम करून दाखवलं आहे. छत्तीसगडच्या जंगलात शिरून सुरक्षा दलाच्या महिला पथकाने महिला दिन एका अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. त्यांनी नक्षलग्रस्त भागात शिरून नक्षल स्मारक ( Naxal monument) पाडलं आहे. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीचा व्हिडिओही (Video) तयार करण्यात आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतं आहे. दंतेश्वरी फायटर आणि डीआरजी यांच्या पथकाने जबेली गावात काँक्रीटनं बनवलेलं नक्षल स्मारक पाडलं आहे. (women commandos demolished Naxal monument)

दंतेवाडाच्या दंतेश्वरी फायटरच्या महिला कमांडोनी आंतरराष्ट्रीय महिला दिन अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी नक्षलवाद्यांनी देखील महिला दिन साजरा केला आहे. तर दुसरीकडे महिला कमांडोंनीही ही कारवाई करत महिला दिन साजरा केला आहे. दंतेवाड्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी महिला नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ एक विशाल स्मारक बनवलं होतं. याची माहिती दंतेश्वरी फायटरच्या महिला कमांडोंना मिळाताच त्यांनी धडक कारवाई केली आहे. त्यांनी लोखंडी घण आणि इतर अवजाराच्या मदतीने हे स्मारक जमीनदोस्त केलं आहे.

" isDesktop="true" id="528865" >

आज सकाळी दंतेश्वरी फायटर आणि डीआरजीच्या महिला कमांडो जबेली गावात पोहोचली. त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारांव्यतिरिक्त लोखंडी घण आणि इतर अवजारं होती. त्यांनी हे नक्षल स्मारक फोडून महिला दिनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच नक्षलवाद्यांना एक कठोर संदेश दिला आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दंतेश्वरी महिला कमांडो स्वत:च्या पद्धतीनं महिला दिन साजरा केला आहे.

हे ही वाचा - पाकिस्तानला धडकी भरवणारा VIDEO, भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केल्या 10 चौक्या

खरंतर गेल्या वर्षी 28 डिसेंबरला सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये याठिकाणी चकमक झाली होती. या कारवाईत सैनिकांनी नक्षलवादी महिला भीमे उर्फ ​​आयतेला ठार केलं होतं. तिच्यावर 5 लाखांच बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. तिच्याच आठवण म्हणून नक्षलवाद्यांनी अरनपूर प्रदेशातील जबेली गावात भव्य स्मारक बांधलं होतं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर महिला कमांडोनी आज ही धडक कारवाई केली आहे. त्यांच्या या कारवाईचं कौतुक अनेक स्तरातून केलं जात आहे.

First published:

Tags: Viral video., Womens day