पुणे, 28 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील सुपे येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका शेतकऱ्याने खसखस तयार करण्याच्या उद्देशाने कांदा आणि लसणाच्या पिकाबरोबर एक वाफा खसखस पेरली होती. परंतु अफूची शेती केली म्हणून पोलिसांनी ही सर्व रोपे हस्तगत केली आहेत. दरम्यान त्या शेतकऱ्यालाही ताब्यात घेतले आहे. त्या शेतकऱ्यावर कारवाईही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यात खसखसीची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खसखसीच्या बोंडाचा वापर अफू बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे या खसखसीच्या शेतीला राज्यात निर्बंध आहेत.
गुजरातमधील नोकरी सोडली, झेंडू शेतीतून कमावले लाखो रुपये, Videoखसखस पेरली का अफू? इंदापूरच्या शेतकऱ्यावर पोलिसांची कारवाई pic.twitter.com/tbvSn0NZUf
— News18Lokmat (@News18lokmat) February 28, 2023
मात्र घरच्या मसाल्यात वापरासाठी शेतकरी खसखसीसाठी लागवड करतात. आता याची माहीती पोलीसांना दिल्यामुळे या शेतकऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर जोरदार चर्चा रंगली होती.
कांदा पाठोपाठ आता कोबीला कवडीमोल भाव मिळत असून कोबीचा एक गड्डा अवघ्या 1 रुपयाला विकला जात आहे. दरम्यान भाव नसल्याने हवालदिल झालेल्या येवल्यातील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचललं आहे.
धामणगाव येथील विजय जेजुरकर या शेतकऱ्याने एक एकर कोबी पिकावर रोटर फिरवून संताप व्यक्त केला. रात्र दिवस राबराब राबून दोन पैशे मिळतील या आशेवर कोबीची लागवड केली होती. मात्र त्यातून हाती काहीच पडले नाही असे मत शेतकऱ्याने व्यक्त केले.
महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांदा एकाच वेळी तयार झाला. राज्यातील कांद्याला अक्षरश: कवडीमोल भाव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना रडवलं आहे. कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. कांद्याचे भाव कमी असल्याने अडचणीत सापडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून कांद्यासाठी वापरण्यात येणारी रक्कम विकल्यानंतर त्यांना वसूल करणे कठीण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.