मराठी बातम्या /बातम्या /मनी /Success Story: गुजरातमधील नोकरी सोडली, झेंडू शेतीतून कमावले लाखो रुपये, Video

Success Story: गुजरातमधील नोकरी सोडली, झेंडू शेतीतून कमावले लाखो रुपये, Video

X
अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील बाळकृष्ण सहाणे यांनी गुजरातमधील नोकरी सोडून शेती सुरू केली. आता झेंडूच्या शेतीतून लाखो रुपये कमावत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील बाळकृष्ण सहाणे यांनी गुजरातमधील नोकरी सोडून शेती सुरू केली. आता झेंडूच्या शेतीतून लाखो रुपये कमावत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar (Ahmednagar), India

    प्रियांका बोबडे, प्रतिनिधी

    अहमदनगर, 28 फेब्रुवारी: आजकाल अनेक तरुण शेती विषयक अभ्यास करून शेती व्यवसायात उतरत आहेत. 8 ते 10 तास नोकरी करून पैसे कमण्यापेक्षा आधुनिक शेतीचे तंत्र आता तरुणांना जवळचे वाटू लागले आहे. शेतात चिकाटीने राबल्यास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवल्याची उदाहरणे अलीकडे वाढली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाने  गुजरातमधील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि झेंडूच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

    गुजरातची नोकरी सोडून सुरू केली शेती

    संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील सहाणे कुटूंब हे मुळचे शेतकरी आहे. बाळकृष्ण सहाणे यांना चार एकर शेती होती. मोठा मुलगा ज्ञानेश्वर यांनी घरच्या परिस्थितीमुळे गुजरातमध्ये पेपर मीलमध्ये नोकरी सुरू केली. मात्र परवडत नसल्याने 2006 मध्ये नोकरी सोडून शेतीत परतण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी ज्योती, बंधू निवृत्त आणि भावजय निशिगंधा यांची साथ मिळाली. चार एकरात त्यांनी आधुनिक शेतीचे प्रयोग सुरू केले. आता ते लाखोंची उलाढाल करत आहेत.

    जोखीम पत्करली अन् यश मिळाले

    सहाणे बंधूनी शेतात तरकारी पिके घेण्यास सुरुवात केली. आधुनिक शेती करत त्यांनी दोडका, कलिंगड, टोमॅटो अशी पिके घेतली. डिसेबंर 2022 मध्ये त्यांनी जोखीम पत्करून तीन एकर झेंडूची लागण करण्याचा निर्णय घेतला. मल्चिंग पेपरवल अप्सरा यलो या झेंडूच्या रोपांची लागवड केली. पिवळ्या फुलांचा झेंडू चांगला आला आणि त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळू लागले.

    Success Story: वर्ध्यात बहरली 'ड्रॅगन फ्रुट'ची शेती, शेतकरी घेतोय लाखोंचे उत्पन्न, Video

    37 दिवसांत फुले काढणीला

    झेंडूच्या झाडांची वाढ चांगली व्हावी, फुले आकर्षक तसेच मोठी व्हावी यासाठी फिश ऑईल व जीवामृतचा वापर केला. त्यामुळे उत्पादन वाढण्यासही मदत झाली. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अल्पशा प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली. दरम्यान, 37 दिवसात फुले काढणीस आली. झेंडू फुलाच्या पहिल्या तोडणीत 600 किलो फुले मिळाली. त्यास प्रतिकिलो 50 रूपयांचा दर मिळाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात फुले निघू लागली व दरही चांगला मिळाला.

    10 टन उत्पन्न, 80 रुपये दर

    तीन एकरात सहाणे बंधूंना आज अखेर सुमारे 10 टन झेंडूचे उत्पादन मिळाले. तर 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला. एकूण सहा लाखांचे उत्पन्न त्यांना झेंडूच्या शेतीतून मिळाले आहे. यापुढेही 10 ते 12 टन फुलांचे उत्पादन मिळेल व बाजारभाव टिकून राहिला तर चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा सहाणे बंधूंनी व्यक्त केली. तर सुरवातीपासून नांगरणी, रोपे, खते, औषधे, मल्चिंग पेपर, ड्रीप, मजुरी यासाठी सुमारे अडीच लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

    Sangli News: दुष्काळी जतच्या माळावर चक्क सफरचंदाची शेती, पाहा शेतकऱ्याची कमाल, Video

    झेंडूच्या फुलांची मागणी या कारणामुळे वाढली

    डिसेंबर महिन्यात चीनसह अन्य देशांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. केंद्राने गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क लावण्याचे आदेश राज्यांना दिले होते. लॉकडाऊन होते की काय या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली नाही. मार्केटमध्ये फुलांची आवक कमी असल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. झेंडू हे फुल बारा महिने वापरत येणारे फुल आहे. कोणत्याही पूजेसाठी, सजावटीसाठी ही फुले वापरली जातात. त्यामुळे सहाणे बंधूंची झेंडूची मागणी वाढत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Agriculture, Ahmednagar, Ahmednagar News, Local18, Success story