मराठी बातम्या /बातम्या /पुणे /PMRDA निवडणुकीत काँग्रेसला झटका, 14 जागांवर भाजपचा विजय

PMRDA निवडणुकीत काँग्रेसला झटका, 14 जागांवर भाजपचा विजय

 महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे.

महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे.

Pune PMRDA election news: पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंगल्या आहेत.

    पुणे, 12 नोव्हेंबर : पीएमआरडीए नियोजन समिती निवडणुकीत (Pune PMRDA Election Result) काँग्रेसला (Congress) पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पुणे मनपातील हक्काची 10 मतं देखील मिळवता आलेली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंदू कदम यांचा पराभव झालाय तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपआपले सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. (Pune PMRDA election BJP wins 14 seats)

    पुणे मनपा हद्दीत भाजप 14, राष्ट्रवादी 7 तर शिवसेनेचा 1 सदस्य पीएमआरडीए नियोजन समितीवर निवडून गेला आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाने या निकालावरून तरी काहीतरी धडा घ्यावा, असा चिमटा राष्ट्रवादीने काढला आहे.

    या निवडणुकीत विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचा चुलत भाऊ काँग्रेस उमेदवार चंद्रकांत कदम यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेससोबतच राज्यमंत्री विश्वजित कदम यांना हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे तीन तर भाजपचे 9 मतं फुटल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

    वाचा : 'सर्वांचेच सामूहिक निलंबन करा' संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचं परिवहन मंत्री अनिल परबांना पत्र

    पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपने 22 पैकी 14 जागांवर विजय मिळविला. भाजपने उभे केलेले सर्व उमेदवार विजयी झाले. यामुळे आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी सरकारला हा एक मोठा धक्का बसल्यातं बोललं जात आहे. तर या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

    राष्ट्रवादीचे विजयाचे स्वप्न भंगले - भाजप

    या निवडणूक निकालानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वल्गना हवेतच विरल्या. विरोधकांचे दिवास्वप्न भंगले असून. मुंजरीलाल के हसीन सपने असेच त्याचे वर्णन करावे लागेल अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    वाचा : उधार न दिल्याने संतप्त ग्राहकाची पिंपरीतील बेकरीत तोडफोड, घटनेचा CCTV आला समोर

    पुण्याच्या विकासासाठी राज्य सरकारला गेल्या दोन वर्षात एकही काम करता आलेले नाही. याची जाणीव नगरसेवकांमध्ये पण आहे. पुणेकरांचा विश्वास भाजपने केलेल्या विकासकामांवर असून शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी आणि क्षमता भाजपमध्ये आहेत याची नगरसेवकांना जाणीव आहे त्यामुळेच सर्व पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. असंही जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: BJP, Election 2021, काँग्रेस