मराठी बातम्या /बातम्या /पुणे /उधार न दिल्याने संतप्त ग्राहकाची पिंपरीतील बेकरीत तोडफोड, घटनेचा CCTV आला समोर

उधार न दिल्याने संतप्त ग्राहकाची पिंपरीतील बेकरीत तोडफोड, घटनेचा CCTV आला समोर

उधार न दिल्याने सटकली अन् थेट बेकरीत तोडफोड केली, पिंपरीतील घटनेचा CCTV

उधार न दिल्याने सटकली अन् थेट बेकरीत तोडफोड केली, पिंपरीतील घटनेचा CCTV

youth vandalised bakery, incident caught in cctv: पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने रागाच्या भरात बेकरीत तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड, 12 नोव्हेंबर : उधार न दिल्याच्या रागातून एका ग्राहकाने बेकरीची मोठ्या प्रमाणात तोडफोड (youth vandalised bakery) केल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)मध्ये घडली आहे. पिंपरी - चिंचवड येथील काळेवाडी परिसरात असलेल्या न्यू रॉयल बेकरी नावाच्या दुकानात ही तोडफोडीची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Bakery vandalised in Pimpri Chinchwad, incident caught in CCTV)

तीन ते चार जण ग्राहक म्हणून या न्यू रॉयल बेकरीमध्ये खाण्यापिण्याचे सामान घेण्यासाठी आले होते, पण नंतर या ग्राहकांनी बेकरी मालकाकडे खाण्या-पिण्याचे पदार्थ उधार देण्याचा तगादा लावला. बेकरी मालकाने ते सामान उधार देणार नाही असे ठाम पणे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून दुकानात ग्राहक म्हणून दाखल झालेल्यांनी बेकरीत तोडफोड केली. यासोबतच दुकानदाराला ही मारहाण केली आहे.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोडफोडीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता त्या सीसीटीव्हीच्या आधारे वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

पिंपरीत Wine Shop चालक आणि ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

ऑक्टोबरमध्ये वाईन शॉप चालक आणि ग्राहकांत हाणामारी झाली होती. वाईन शॉपमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये आणि वाईन शॉप चालकात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली आहे. पिंपरीतील रिगल वाईन्स शॉपमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. ग्राहकांनी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानाचीही तोडफोड केली.

वाईन शॉप मालकाला दारुडे मारहाण करत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तर दारुडे दुकानाबाहेर तोडफोड करत असतानाची दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली होती. पिंपरी - चिंचवड शहरातील अशोका थिएटर जवळील रिगल वाईन्समध्ये ही मारहाण आणि तोडफोडीची घटना 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

येरवड्यात दोन दुकानांची तोडफोड

गेल्या महिन्यात येरवडा जयप्रकाश नगर येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. जयप्रकाश नगर येतील किराणा दुकाने दहशत माजविण्याच्या दृष्टीने फोडण्यात आली. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. येरवडा भागात दहशत माजविण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटेमोठे प्रकार वारंवार घडत असतात.

किराणा दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जण येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामान फोडत असल्याचं सीसीटीव्ही कैद झालं. यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झालेले आहेत.

First published:
top videos

    Tags: Cctv footage, Crime news, Pimpri chinchawad, Pune