पुणे, 07 जून : पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. अशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये पुणेकरांसाठी अनेक नियम शिथिल करण्यात आले असून नागरिकांसाठी अनेक दुकानं आणि बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. अशात येत्या संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर उघणार का? यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णांची वाढती संख्या लक्षात येता पुण्यात 8 जूनला संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर बंदच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी धार्मिक स्थळं उघडण्यासाठी बंदी आहे. त्यानुसार उद्या दगडूशेठ गणपती मंदिरही बंद असणार आहे.
दरम्यान, खरंतर पुण्यासुद्धा अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या सर्व बाजारपेठा आणि दुकानं नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पण यामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. सर्व उपाययोजना राबल्या तरी पुण्यात कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणं मोठ्या संख्येनं समोर येत आहेत.
व्हिडिओ आवडला नाही म्हणून TIK TOK स्टारवर रोखली बंदूक, रेकॉर्डिंक केलं व्हायरल
पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7 कोरोना बधितांचा मृत्यू झाला तर 342 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात 259 जणांना डिस्चार्जही देण्यात आला तर 195 जण अजूनही गंभीर आहेत. त्यामुळे कितीही सूट दिली असली तरी नागरिकांना आपली काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या अत्यावश्यक कांमासाठीच बाहेर पडा आणि सुरक्षेचे नियम पाळा असं आवाहन पुणे पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
गेल्या 24 तासामध्ये पुणे पालिका हद्दीतही 290, पिंपरी चिंचवड परिसरात 29 तर छावणी भागात 15 आणि ग्रामीण भागात 8 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 413 झाली आहे.
पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 438 झाली आहे. तर ॲक्टिव रुग्ण 4 हजार 428 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डाळभातावरून दोघांची केली हत्या, 6 गाड्या बदलून आरोपी मुंबईहून पुण्यात
पुणे जिल्ह्यातील 8 हजार 916 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टि रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
पुण्यात सूट दिल्यानंतर काय आहे रुग्ण वाढीचा आकडा, वाचा अपडेट
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona