नवी दिल्ली, 07 जून : सोशल माध्यमांचा अतिरेक झाला की त्यातून गुन्हेगारीसारखे धक्कादायक प्रकार घडतात. सध्या TIK TOK हे भारतीयांचं सगळ्यात आवडतं अॅप आहे असं म्हणायला हरकत नाही. पण याच TIK TOKच्या वादातून एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण भरदिवसा एका तरुणावर बंदूक रोखत असल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ एका TIK TOK वापरकर्त्याचा आहे. ज्याच्या व्हिडिओ बनवण्यामुळे गावकऱ्यांना राग आला. यात प्रेम प्रकरण असल्याचा संशयही पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये गावातील दोघांनी एका तरुणावर बंदूक रोखली आहे आणि त्याला धकमीही देत असल्याचं दिसत आहे. भरदिवसा अशा प्रकारे मुलं बंदूक घेऊन फिरत असल्याचं पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
दिल्ली में सरे आम हथियार से मारने की धमकी, सच्ची घटना हे। छावला थाने के अंतर्गत आता हे ये गाँव पंडवाला , लड़के का नाम तनशि यादव हे, डरके police कमपलैंट नहि कराई हे, कृपया दिल्ली police एसपर ध्यान दे।@AmitShah @CPDelhi @p_sahibsingh @SunilYadavBJP @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/TtqBjl5Kj9
— Shashi Yadav (@ShashiYadav3806) June 6, 2020
सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर द्वारका जिल्हा पोलिसांच्या डीसीपीने या प्रकरणाची दखल व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर चावला पोलीस स्टेशनचे एसएचओ या व्हिडिओविषयी अधिक माहिती गोळा करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांना टॅग केलं गेलं होतं आणि चौकशीची मागणी केली होती.
डाळभातावरून दोघांची केली हत्या, 6 गाड्या बदलून आरोपी मुंबईहून पुण्यात
TIK TOK बनवण्यावरून सुरू झाला वाद
TIK TOKवर व्हिडिओ बनवण्याच्या वादावरून दोन मुलांनी एका तरुणावर पिस्तूल रोखली आणि त्याला मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीच्या चावला भागातल्या एका गावातली आहे. हा व्हिडिओ 3 जूनचा असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित मुलावर TIK TOK बनवल्याबद्दल संतापलेल्या गावातील दोन मुलांनी पीडित मुलाला पिस्तूलने मारण्याची धमकी दिली आणि मारहाण केली. हे प्रकरण प्रेमसंबंधाशीदेखील संबंधित असू शकतं असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पुण्यात सूट दिल्यानंतर काय आहे रुग्ण वाढीचा आकडा, वाचा अपडेट
पोलिसांनी सध्या या प्रकरणात आयपीसी कलम 506 अंतर्गत गुंडगिरी व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पीडित तरुण हा TIK TOK आर्टीस्ट आहे आणि त्याने बनवलेले व्हिडिओ आरोपींना आवडत नव्हते त्यामुळे त्यांनी त्याला धमकावल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, यात पुढील तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
स्पेनला मागे टाकत सर्वाधिक रुग्ण असलेला 5वा देश बनला भारत, 2.43 लाखाच्यावर रुग्ण
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.