पुण्यात सूट दिल्यानंतर काय आहे रुग्ण वाढीचा आकडा, वाचा अपडेट

पुण्यात सूट दिल्यानंतर काय आहे रुग्ण वाढीचा आकडा, वाचा अपडेट

सर्व उपाययोजना राबल्या तरी पुण्यात कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणं मोठ्या संख्येनं समोर येत आहेत.

  • Share this:

पुणे, 07 जून : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबण्यात आला. पण यामध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंद आहे. खरंतर पुण्यासुद्धा अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या सर्व बाजारपेठा आणि दुकानं नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पण यामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. सर्व उपाययोजना राबल्या तरी पुण्यात कोरोना रुग्णांची नवीन प्रकरणं मोठ्या संख्येनं समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7 कोरोना बधितांचा मृत्यू झाला तर 342 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात 259 जणांना डिस्चार्जही देण्यात आला तर 195 जण अजूनही गंभीर आहेत. त्यामुळे कितीही सूट दिली असली तरी नागरिकांना आपली काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या अत्यावश्यक कांमासाठीच बाहेर पडा आणि सुरक्षेचे नियम पाळा असं आवाहन पुणे पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

गेल्या 24 तासामध्ये पुणे पालिका हद्दीतही 290, पिंपरी चिंचवड परिसरात 29 तर छावणी भागात 15 आणि ग्रामीण भागात 8 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 413 झाली आहे.

स्पेनला मागे टाकत सर्वाधिक रुग्ण असलेला 5वा देश बनला भारत, 2.43 लाखाच्यावर रुग्ण

शुक्रवारी राज्यात कोरोनाचा कहर

राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2436 नवे रुग्ण आढळून आले. राज्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्यावर पोहोचली. दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी 1475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण (Recovery Rate) 43.81 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे. आतापर्यंत 35156 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळाने संसार उद्धवस्त केले, पोलिसांनी सावरले

एका दिवसांत 139 रुग्णां मृत्यू...

मुंबईत सर्वाधिक- 54, ठाणे- 30, कल्याण-डोंबिवली- 7, वसई-विरार आणि भिंवडी येथे प्रत्येकी एक, जळगाव जिल्ह्यात 14, मालेगाव-8, नाशिक- 2, पुणे,- 14, सोलापूर-2, रत्नागिरी-5, औरंगाबाद- 1 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 438 झाली आहे. तर ॲक्टिव रुग्ण 4 हजार 428 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 8 हजार 916 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टि रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 7, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading