बेडच मिळेना, हॉस्पिटलसमोरच महिला दिवसभर रुग्णवाहिकेतच! दौंडचा विदारक VIDEO

बेडच मिळेना, हॉस्पिटलसमोरच महिला दिवसभर रुग्णवाहिकेतच! दौंडचा विदारक VIDEO

दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन आले तरी उपचार करायला समोर येत नाही. त्यामुळे...

  • Share this:

पुणे, 17 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Case) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हॉस्पिटल्समध्ये (Covid Hospital) बेड मिळणे कठीण झाले आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Dound) तालुक्यात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे एका महिला रुग्णाला रुग्णवाहिकेमध्येच ठेवावा लागल्याची विदारक परिस्थिती समोर आली.

पुण्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. दौंड तालुक्यात राहणाऱ्या या महिलेला अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या महिलेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण, बेडच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले.

त्यानंतर ज्या रुग्णवाहिकेतून या महिलेला आणण्यात आले होते तिथून पुन्हा 10 किमी दूर असलेल्या पारगावातील रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे बेड उपलब्ध नव्हता. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन उपलब्ध असल्यामुळे पुन्हा या महिलेलाच तालुक्यात आण्यात आले.

पण, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने सकाळपासून एका महिलेला रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे, दौंड तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याचे भीषण वास्तव हे दौंडमध्ये समोर आले आहे. त्यामुळे या महिलेची प्रकृती खालवत चालली आहे.

शक्तिमानमधील खलनायकाला कोरोनाची लागण; डॉ. जयकॉल मागतोय प्लाझ्मा

दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन आले तरी उपचार करायला समोर येत नाही. त्यामुळे या महिलेला एका हॉस्पिटलच्या दारात रुग्णवाहिकेमध्येच राहण्याची वेळ आली आहे.

साडेतीन वर्षांनी लालू प्रसाद तुरुंगातुन येणार बाहेर, मात्र इतर आरोपांचं काय?

दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात विचारणा केली असता 6 व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयाला दिली आहे, अशी उत्तरे नातेवाईकांना मिळत आहे. त्यामुळे नातेवाईकांनी आपल्या रुग्णाला रुग्णवाहिकेमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, दौंड शहरात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 208 इतकी आहे. तर ग्रामीण भागात रुग्ण संख्या 1002 वर पोहोचली आहे.

Published by: sachin Salve
First published: April 17, 2021, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या