साडेतीन वर्षांनी लालू प्रसाद तुरुंगातुन येणार बाहेर, मात्र इतर आरोपांचं काय?

साडेतीन वर्षांनी लालू प्रसाद तुरुंगातुन येणार बाहेर, मात्र इतर आरोपांचं काय?

बहुचर्चीत पशुपालन घोटाळा प्रकरणी जामीनानंतर पुढील एकदोन दिवसात लालू प्रसाद यादव (Lalo Prasad Yadav) बाहेर येतील.1 लाख रुपये जातमुचलका आणि 10 लाख रुपये दंड आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला.

  • Share this:

रांची,17 एप्रिल: तुरुंगामधुन बाहेर येण्याचा लालु प्रसाद (Lalu Prasad Yadav) यांचा मार्ग मोकळा झालाय. बहुचर्चीत पशुपालन घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगणाऱे राजदचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यांना शनिवारी झारखंड हायकोर्टात (Jharkhand High Court) न्यायमुर्ती अपरेश सिंह यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. 1 लाख रुपये जातमुचलका आणि 10 लाख रुपये दंड आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसात लालू प्रसाद यादव बाहेर येतील. लालू प्रसाद यादव यांना देशाबाहेर जाण्यासाठी कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यांना मोबाईल नंबर आणि पत्ता बदलता येणार नाही.

ऑक्टोबर 2020 मध्ये लालूंना चारा घोटाळ्यात जामीन मिळुनही पशुपान घोटाळा प्रकरणी त्यांना तुरुंगातच रहावे लागले. बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election) रणधुमाळी सुरू असताना लालु प्रसाद यादवांना चारा घोटाळा प्रकरणी जामीन मिळाला पण, चारा घोटाळ्यातील चाईबासा ट्रेजरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू होती. पण कोरोना काळामुळे CBIने सुनावणी थांबवली आहे.

चाईबासा प्रकरणातील सुनावणी अपुरी

चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित चाईबासा कोषागार प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे.

( हे वाचा : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दिलासा; जामीन मंजूर)

एस्ममध्ये लालूंवर उपचार

लालू यादव यांच्यावर सध्या दिल्लीमधील एम्स रुग्णालायात उपचार सुरू आहेत. सुमारे अडीच वर्षे रांचीमधील रिम्स रुगणालयात उपचार घेतल्यानंतर जानेवारीत अचानक त्यांची तब्येत बिघडली. छातीत दुखणं आणि श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे त्यांला 23 जानेवारी 2021 रोजी रिम्स मधून एम्समध्ये पाठवण्यात आलं.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना शिक्षा

प्रथम प्रकरण

चाईबासा कोषागार

बेकायदेशीरपणे 37.7 कोटी रुपये काढणे

लालू प्रसाद यांच्यासह 44 आरोपी

या प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा

दुसरे प्रकरण

देवघर कोषागार

84.33 लाख रुपयांची अवैध रक्कम काढल्याचा आरोप

लालू यांच्यासह 38 जणांवर खटला

लालू प्रसाद यांना साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली

तीसरे प्रकरण

तीसरे प्रकरण

चाईबासा कोषागार

33.67 कोटी रुपये अवैधरित्या काढले

लालू प्रसाद यांच्यासह  56 आरोपी

5 वर्षांची शिक्षा

चौथे प्रकरण

डुमका कोषागार

3.13 कोटी अवैधरित्या काढले

दोन वेगळ्या कलमांखाली 7-7 वर्षांची शिक्षा 

चारा घोटाळ्यात काय झाले?

27 जानेवारी 1996: पशुखाद्य घोटाळ्याच्या रूपाने सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रुपयांची लूट. चाईबासा ट्रेझरीमधून 37.6 कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने काढून घेण्यात आले.

11 मार्च 1996: पटना हायकोर्टाने चारा घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयला निर्देश दिले.

19 मार्च 1996: सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाची पुष्टी करत हायकोर्टाला प्रकरणाची पाहणी करण्यास सांगितले.

27 जुलै 1997: लालू प्रसाद यादव यांच्याव सीबीआयाचा फास.

30 जुलै 1997: लालू प्रसाद यांनी सीबीआय कोर्टासमोर आत्मसमर्पण केले.

19 ऑगस्ट: लालू प्रसाद आणि राबडीदेवीविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला.

4 एप्रिल 2000: लालू प्रसाद यादव यांच्याविरूद्ध दाखल आरोपपत्रात रबडीदेवींना सह-आरोपी बनले.

5 एप्रिल 2000: लालू प्रसाद आणि राबड़ीदेवीचं आत्मसमर्पण,रबडीदेवींना जामीन मंजूर.

9 जून 2000: लालू प्रसाद यांच्याविरोधात आरोपपत्र निश्चिच.

ऑक्टोबर2001: झारखंड स्वतंत्र राज्य झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण नव्या राज्यात हस्तांतरित केले. यानंतर लालूंनी झारखंडमध्ये आत्मसमर्पण केले. 

18 डिसेंबर 2006: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद आणि राबडीदेवी यांना क्लीन चिट.

2000 ते 2012: या प्रकरणात सुमारे 350 लोकांची साक्ष झाली.दरम्यानच्या काळात खटल्यातील अनेक साक्षीदारही मरण पावले.

17 मे 2012: विशेष सीबीआय कोर्टाने लालू यादव यांच्यावर या प्रकरणात काही नवीन आरोप लावले. यात डिसेंबर 1995 ते जानेवारी 1996 दरम्यान डुमका कोषागारतून 3.13 कोटी रुपयांची रुपये काढल्य़ाचा आरोप ठेवण्यात आला.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 6:46 PM IST

ताज्या बातम्या