पुण्यात मद्यपींना जाब विचारल्यामुळे माजी आमदारांना धक्काबुक्की, दोघांना अटक

पुण्यात मद्यपींना जाब विचारल्यामुळे माजी आमदारांना धक्काबुक्की, दोघांना अटक

कोथरुडमधील सहजानंद सोसायटीजवळ हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 07 जून : पुण्यात कोथरुड भागात दारुड्यांना जाब विचारला म्हणून जेष्ठ नागरिक त्यांचा मुलगा, सून यांना दारुड्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळाजवळ राहणाऱ्या कोथरुडच्या माजी आमदार भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनाही या दारुड्यांनी धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटीजवळ हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. याबाबत पोलिसांनी 4 पैकी 2 जणांना अटक केली तर मेधा कुलकर्णी यांच्यावर हात उचलणाऱ्यासह 2 जण फरार आहेत. अमर सयाजी बनसोडे आणि विनोद सुरेश गद्रे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. मानसी राहुल कोल्हे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डाळभातावरून दोघांची केली हत्या, 6 गाड्या बदलून आरोपी मुंबईहून पुण्यात

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सहजानंद सोसायटीजवळ परिसरात चार तरुण हे मद्यपान करण्यासाठी बसले होते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या राहुल कोल्हे यांनी त्यांना जाब विचारला. याचा राग आल्यामुळे दोघांनी राहुल यांना मारहाण केली. यावेळी राहुल यांची पत्नी मानसीदेखील तिथे होत्या.

या भांडणाचा आवाज होताच शेजारी राहायला असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आरोपींना विचारणा केली असता. चौघांनी मेधा कुलकर्णी यांनी धक्काबुक्की केली आणि पळ काढला.

पुण्यात संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर उघडणार का?

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत सहजानंद सोसायटीजवळ मद्यपींचा मोठा त्रास होत आहे. रोज इथे कोणीतरी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर अनेकवेळा सांगूनही पोलीस दखल घेत नसल्याचं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

व्हिडिओ आवडला नाही म्हणून TIK TOK स्टारवर रोखली बंदूक, रेकॉर्डिंक केलं व्हायरल

संपादन - रेणुका धायबर

First published: June 7, 2020, 10:58 AM IST
Tags: #Pune

ताज्या बातम्या