• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुणे महापालिकेच्या तुघलकी कारभाराचा पुणेकरांना फटका! 11 टक्क्यानेे वाढणार कराचा बोजा?

पुणे महापालिकेच्या तुघलकी कारभाराचा पुणेकरांना फटका! 11 टक्क्यानेे वाढणार कराचा बोजा?

पुणे महापालिकेने वर्षाला 130 कोटी रुपये उत्पन्न वाढ करण्यासाठी करवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे 11 टक्के करवाढीला पुणेकरांना सामोरे जावे लागू शकते.

 • Share this:
  पुणे, 13 जानेेवारी: पुणे महापालिकेने वर्षाला 130 कोटी रुपये उत्पन्न वाढ करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात करवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे 11 टक्के करवाढीला पुणेकरांना सामोरे जावे लागू शकते. पुणे महापाहिलेेकेने 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना हा बोजा सहन करावा लागणार आहे, मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे मनपाच्या मिळकतकराची थकबाकी ठेवणाऱ्यांसाठी 75 टक्के सूट देणारी अभय योजना महापालिका गेल्या काही महिन्यांपासून राबवत आहे. कमी पडणाऱ्या निधीची पूर्तता करण्यासाठी 11 टक्के कर वाढवण्याचा हा प्रस्ताव आहे. पुणे महापालिकेच्या महासभेने या प्रस्तावास मंजुरी दिली तर पुणेकरांच्या खिशाला चाप बसणार आहे. या प्रस्तावाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण करात साडेपाच टक्के, सफाई करामध्ये साडेतीन टक्क्यांची वाढ, जल:निस्सारण करामध्ये 2 टक्के इ. अशी प्रस्तावित करवाढ आहे. त्यामुळे वर्षभरात 130 कोटींचा महसूल वाढून वर्षभरात मिळकतकराचं उत्पन्न सव्वा दोन हजार कोटी होईल असं प्रशासनाच्या प्रस्तावात नमुद केलं आहे. (हे वाचा- युनिक हेल्थ आयडी काय आहे? कसा केला जातो या ID चा उपयोग) पुणे पालिकेवर असा आरोप केला जात आहे की, गेल्या 3 महिन्यांत 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांना जवळपास 175 कोटी रुपयांची सूट देऊन महापालिकेने 370 कोटी रुपये थकीत कर मिळवला आहे. या व्यतिरिक्त 1 कोटींपेक्षा जास्त महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी असणाऱ्या 474 थकबाकीदारांकडील 1218 कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाहीत, ज्यामध्ये पाटबंधारे खात्याकडील 53 कोटी तर अन्य सरकारी / निमसरकारी खात्यांकडे देखील 50 कोटींची थकबाकी आहे. याशिवाय पाणीपट्टीची जवळपास 400 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सत्ताधाऱ्यांवर असा आरोप केला जात आहे सामान्यांकडून 130 कोटींची रक्कम उभी करण्यासाठी अतिरिक्त कर घेतला जात आहे आणि दुसरीकडे थकबाकीदारांना 175 कोटींची सवलत दिली जात आहे.
  दरम्यान येणारं वर्ष ही निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे भाजपकडून करवाढीला पाठिंबा दिला जाईल की नाही असा सवाल उपस्थित राहतो आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. करवाढीबाबतच्या प्रस्तावावर विशेष सभा घेतली जाणार आहे. दरम्यान 2022 मध्ये निवडणुका असल्याने देखील हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.  करवाढीला मंजुरी मिळाल्या पुणेकरांना दुहेरी फटका बसू शकतो. कारण दोन वर्षांपूर्वी भाजप सरकारने निवासी घरांना मालमत्ता करामध्ये मिळणारी सूट रद्द केली होती. आता पुन्हा नव्याने 11 टक्के करवाढ लागू झाली तर कोरोना काळात (Coronavirus) हे सामान्यांसाठी आर्थिक फटका देणारं ठरू शकतं.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: