पुणे, 08 ऑगस्ट : पुण्यातील कोपरेगावामध्ये (koparegaon) एका गॅरेजला भीषण आग (fire) आटोक्यात आली आहे. या आगीत 14 बसेस जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीमध्ये दोन जण गंभीर भाजले आहे. आगीत भाजलेल्या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजता गॅरेजला भीषण आग लागली. पहाटे दोनच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
#पुणे - शिवने -उत्तमनगरमधील बस मॉडिफाय करणाऱ्या गॅरेजला आग, 14 वाहनं जळून खाक pic.twitter.com/GNuhYRRMUh
— News18Lokmat (@News18lokmat) August 7, 2021
कोपरे गावात एक बस मॉडिफाय करणारे गॅरेज आहे. या गॅरेजला रात्री अचानक भीषण आग लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केमिकलचा स्फोट झाल्याने ही आग लागली. आग लागून 14 बसेस जळून खाक झाल्या आहेत.
ही आग इतकी भीषण आहे की, आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून आले. केमिकलचा स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्ररुपधारण केले आणि बघता बघता गॅरेज आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत 14 बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या.मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान आगीचं नेमकं कारणही अद्याप समजू शकलेलं नाही.
बापरे! व्हिस्कीच्या एका बॉटलनं अख्खं परराष्ट्र मंत्रालय लावलं कामाला; काय आहे प्रकरण?
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आणि अखेर अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या साहाय्याने आग विझवण्यात यश आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune