मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'आरडाओरड करू नका आधी वैचारिक गुंता सोडवा', सेनेचा भाजपच्या अध्यक्षांवर पलटवार

'आरडाओरड करू नका आधी वैचारिक गुंता सोडवा', सेनेचा भाजपच्या अध्यक्षांवर पलटवार

देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय?

देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय?

देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय?

पुढे वाचा ...
मुंबई, 29 जुलै : भाजपने आगामी काळात शिवसेना सोबत आली तरी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. भाजपच्या या भूमिकेवर 'जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो.  विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये' अशा शब्दात शिवसेनेनं जोरदार पलटवार केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राज्यात स्वबळावर सत्ता आणा, अशी भूमिका मांडणारे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. 'भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते, असा टोला सामाना अग्रलेखात भाजपाला लगावला आहे. 'भाजपने आक्रमणाच्या तोफा फक्त महाराष्ट्रातच उडवल्या असे नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांडय़ास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही.' अशी आठवणच नड्डांना करून दिली. 'भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले तरच राज्याचे हित?' 'महाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे! नड्डा म्हणतात, ‘‘स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा!’’ त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही' असा सणसणीत टोला भाजपला लगावण्यात आला. 'नड्डांच्या मनाचा गोंधळ उडाला' 'स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे. भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो.' असं म्हणत नड्डांच्या विधानाची खिल्ली उडवण्यात आली आहे. 'तरच तो राजा शोभतो' 'ज्या राज्यात विरोधकांची सरकारे आहेत तेथेच फक्त कोरोनाबाबत भ्रष्टाचार व सावळागोंधळ आहे, असे सांगणे हे निरोगी राजकारणाचे लक्षण नाही. जर राज्यात कोरोना संकट वाढले असेल व तेथे अपयश दिसत असेल तर त्या अपयशाची जबाबदारी देशाचे नेते म्हणजे पंतप्रधानांवर येतेच. गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या राज्यांत कोरोना महामारीने जे अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे, त्याची संपूर्ण माहिती आम्ही महाराष्ट्र किंवा दिल्लीच्या भाजप कार्यालयात पाठवायला तयार आहोत. हे कर्तव्य आहे व केंद्राने त्या कामी सहकाराचा हात पुढे केला पाहिजे. राज्यकर्त्याने व राजाने मनाची दिलदारी दाखवायला हवी. तरच तो राजा शोभतो.' असं म्हणत मोदींवर टीका करण्यात आली.
First published:

पुढील बातम्या