मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune News: शिक्षणासाठी पैसे मागितल्याने संतापला नवरा, रागाच्या भरात बायकोला ढकलले विहिरीत

Pune News: शिक्षणासाठी पैसे मागितल्याने संतापला नवरा, रागाच्या भरात बायकोला ढकलले विहिरीत

शिक्षणासाठी पैसे मागितल्याने संतापला नवरा, रागाच्या भरात पत्नीला ढकलले विहिरीत

शिक्षणासाठी पैसे मागितल्याने संतापला नवरा, रागाच्या भरात पत्नीला ढकलले विहिरीत

Husband pushed wife into well: शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे मागितल्याने पती संतापला अन् पत्नीला विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे, 20 ऑक्टोबर : मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो, त्यासाठी मुली, महिलांना प्रोत्साहित सुद्धा केलं जाते. आज महिला सरकारी क्षेत्र असो किंवा खासगी क्षेत्र असो सर्वत्र चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मात्र असे असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षणासाठी पैसे (money for education) मागितल्याने पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले (man pushed wife into well) आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील (Aambegaon taluka) मंचर-घोडेगाव रस्त्यालगत ही घटना घडली आहे. पत्नीचं नशीब बलवत्तर म्हणून पत्नी बचावली आहे. या प्रकरणी आरोपी पती अनिल राठोड याच्या विरोधात मंचर पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनिल हा अवसरी पॉलिटेक्निक महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करतो.

पीडित वनिता यांनी आपला पती अनिल राठोड याच्याकडे शिक्षणासाठी पैसे मागितले होते. सोमवारी सकाळी वनिता राठोड यांनी पती अनिल यांच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक असलेली फी मागितली. त्यावेळी त्याने पैसे देण्यास नकार दिला. तुझ्या माहेरावरून पैसे माग असे ही तो म्हणाला. त्यानंतर पती आणि पत्नी यांच्यात जोरदार वाद झाला.

हा वाद सुरू असतानाच पत्नी वनिताने म्हटलं, तुम्ही मला फी भरण्यासाठी पैसे द्या किंवा माहेरी सोडा. यानंतर अनिल राठोड याने पत्नीला फिरायला जाऊया असे सांगत घराबाहेर नेलं. यमग तपनेश्वर मंदिराजवळून चालत जात असताना रस्त्याच्या शेजारी असलेल्या विहिरीत अनिलने विनाता ढकलून दिले. सुदैवाने यात वनिता बचावली आहे.

विहिरीत पडताच वनिताने आरडाओरड सुरू केला आणि मदतीसाठी हाक दिली. यावेळी वनिताचा आवाज ऐकून स्थानिकांनी तेथे येत तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर वनिता हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात शुद्धीवर आलल्यावर वनिता हिला पती अनिल याने धमकावले आणि इस्त्रीच्या कारणावरून आपल्यात वाद झाल्याचं सांग असं म्हटलं. या सर्व प्रकाराची माहिती पत्नीने पोलिसांना दिली आहे.

पुण्यात धाकट्या भावाची पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या

पुण्यातील हडपसर परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. आरोपी तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची झोपलेल्या जागीच पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या केली आहे. ही अमानुष घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं, घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Pune