Home /News /pune /

Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव

Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव

9 महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झालं होतं.

    पुणे, 14 ऑगस्ट : पुण्यातील (Pune News) इंदापूर भागातील भटनीमगाव भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने आपल्या पत्नीची (Killed wife) हत्या केली. हत्येमागील कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. शुक्रवारी एका नातेवाईकांच्या लग्नासाठी हे दाम्पत्य गेलं होतं. या लग्नात पत्नीने हळदीच्या कार्यक्रमात पतीला खूप जास्त हळद लावली या रागातून त्याने पत्नीची हत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. या प्रकरणात आरोपी जानसन पोपट पवार (25 वर्षे) आणि त्याचे वडील तानाजी या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर मृत महिलेचं नाव सीमा पवार (20 वर्षे) असून ती पतीसह एकत्र कुटुंबात राहत होती. या प्रकरणात इंदापूरचे पोलीस इन्स्पेक्टर गोडसे यांनी सांगितलं की, ते कुटुंबातील एका नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. तेथे हळदी समारंभात पत्नीने पतीला खूप जास्त हळद लावली. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. जेव्हा रात्री ते दोघे झोपायला गेले तेव्हा पतीने जवळ असलेला स्क्रू-ड्रायव्हर घेतला आणि पत्नीवर वार केले. हे ही वाचा-वडील खात होते चणे, मुलानेही केला हट्ट; खाताच 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू! 9 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न मिळालेल्या माहितीनुसार 9 महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. सीमा ही जानसन यांची दुसरी पत्नी होती, तर सीमाचं हे तिसरं लग्न होतं. ते पारधी समाजातील असल्याची माहिती समोर आली असून ठिकठिकाणी मजुराचं काम करून घर चालवित होते. या प्रकरणात तरुणाविरोधात 302 आणि 34 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Pune, Wedding

    पुढील बातम्या