मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /वडील खात होते चणे, मुलानेही केला हट्ट; खाताच 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू!

वडील खात होते चणे, मुलानेही केला हट्ट; खाताच 3 वर्षांच्या बाळाचा मृत्यू!

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रतलाम, 14 ऑगस्ट : मुलाला चणे खाऊ घालणं येथील एका बापाला महागात पडलं आहे. चणे खाल्ल्यामुळे 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चणे खाल्ल्यानंतर मुलं बेशुद्ध झालं. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र येथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. सध्या पोलीस पोस्टमार्टमच्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाममध्ये ही घटना घडली आहे. अचानक झालेल्या मुलाच्या मृत्यूमुळे हसत्या खेळत्या घरात शोककळा पसरली आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना रतलाममधील झोडिया गावातील आहे. येथे राहणारा गौतम आपल्या मेव्हण्यासोबत दुकानात उभं राहून चणे खात होते. त्यादरम्यान गौतम याचा 3 वर्षांचा मुलगा महेश तेथे पोहोचला. आणि त्यानेही वडिलांकडे चणे खाण्याचा हट्ट केला. यानंतर गौतमनेही आपल्या मुलाला चणे खाण्यासाठी दिले. सांगितलं जात आहे की, काही वेळानंतर मुलगा बेशुद्ध झाला आणि जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा-Shocking! 6 फूट लांब लोखंडी रॉड छातीतून आरपार;5 तास सुरू होती शस्त्रक्रिया शेवटी

यानंतर बाळाचे वडील आणि कुटुंबांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. येथे डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि मृत घोषित केलं. चणे खाताना ते गळ्यात अडकले व श्वास रोखल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलेला नसल्यामुळे नेमकं कारण सांगू शकत नाही. पोलिसदेखील पोस्टमार्टमच्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

First published:

Tags: Crime news, Death, Madhya pradesh