जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 15 वर्षाच्या मुलाने कोरोनाला हरवलं, मात्र डायलेसिस न केल्याने अवघ्या 2 दिवसांत गमावला जीव

15 वर्षाच्या मुलाने कोरोनाला हरवलं, मात्र डायलेसिस न केल्याने अवघ्या 2 दिवसांत गमावला जीव

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

जोपर्यंत दुसऱ्या टेस्टचा अहवाल नेगटीव्ह येत नाही. तोपर्यंत डायलिसिस करण्यास खाजगी रुग्णालयांनी नकार दिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 18 मे: नवी मुंबईत एका 15 वर्षीय मुलाचा डायलिसिस न केल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलाला कोरोनाची लागण झाली होती. परंतु कोरोनावर या मुलाने मात केली. 13 तारखेला या मुलास घरी सोडण्यात आलं आणि 15 मे रोजी या मुलाचे पुन्हा डायलिसिस होणे गरजेचे होते. वाशी येथील मनपा रुग्णालय कोव्हिड 19 रुग्णालय करण्यात आल्याने तेथील डायलिसिस सेंटर बंद आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयात डायलिसिसची विचारणा केली असता दोन टेस्ट निगेटीव्ह आल्याचे अहवाल खाजगी रुग्णालयाकडून मागण्यात आले. जोपर्यंत दुसऱ्या टेस्टचा अहवाल नेगटीव्ह येत नाही. तोपर्यंत डायलिसिस करण्यास खाजगी रुग्णालयांनी नकार दिला. अखेर बेलापूर येथील रुग्णालयाने डायलिसिस करण्याची तयारी दर्शवल. मात्र त्यापूर्वीच त्या मुलाचा मृत्यू झाला. शहरातील इतर रुग्णालयांनी सहकार्य न केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. एकूणच काय तर या मुलाने कोरोनाला तर हरवले मात्र रुग्णालयांच्या असहकार्यामुळे त्याने जीव गमावला. हेही वाचा- मुलाला अखेरचा निरोप देताना आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला, शहीद धनाजी होनमाने यांच्यावर अत्यंसंस्कार दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी गंभीर आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. विशेषत: ज्यांना नेहमी डायलेसिसची आवश्यकता असते, अशा रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. कोरोनाची चाचणी केल्याशिवाय डायलेसिस करण्यास रुग्णालयांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवला जावा, अशी मागणी समोर येत आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात