'डॉक्टरांनी मुलीला सांगितलं 70 टक्के केस हातातून गेली आहे', जितेंद्र आव्हाडांनी सांगितला कठीण प्रसंग

'डॉक्टरांनी मुलीला सांगितलं 70 टक्के केस हातातून गेली आहे', जितेंद्र आव्हाडांनी सांगितला कठीण प्रसंग

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आजारापणाबद्दल आणि त्यावेळी निर्माण झालेल्या कठीण प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या विळख्यातून राजकीय नेतेही वाचू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी ते या आजारातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आजारापणाबद्दल आणि त्यावेळी निर्माण झालेल्या कठीण प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे.

'सुरुवातीला मला कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर माझी स्थिती लक्षात घेता मला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परिस्थिती हाताबाहेर असल्याचं सांगितलं गेलं. तसंच डॉक्टरांनी माझ्या मुलीला बोलवून घेत 70 टक्के केस हाताबाहेर गेली असल्याचं सांगितलं होतं,' असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

'कोरोनासारख्या साथीच्या रोगावेळी काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र अतिशहाणपणा केल्याने मला कोरोना झाला. मी लोकांसाठी काम करताना तब्बेतीचा विचारच केला नाही. मात्र त्यामुळे कुटुंबियांना काय त्रास होईल, याची कल्पनाही केली नव्हती. लोकांनी नियम पाळणं गरजेचं आहे. मीही ते पाळले असते तर आज माझ्यावर ही वेळ ओढावली नसती,' असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ICU मध्ये असताना लिहिली होती चिठ्ठी

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आजारपणाबद्दल भाष्य करत असताना आयसीयूत असताना आपण एक चिठ्ठी लिहिली होती, अशी कबुलीही दिली आहे. 'मला काही झाल्यास सर्व संपत्ती माझ्या मुलीच्या नावावर करा, असं मी या चिठ्ठीत लिहिलं होतं,' अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 18, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या